Subscribe Us

टीईटी TET परीक्षा रविवारी, प्रवेशपत्र उपलब्‍ध; राज्यातून तीन लाख पेक्षा जास्त उमेदवार जाणार सामोरे!



(नवेपर्व न्यूज विशेष प्रतिनिधी)

महाराष्ट्र परीक्षा परिषदेतर्फे MSCE तर्फे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे (TET) चे आयोजन रविवारी 10 नोव्हेंबर 2024 रोजी केले आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्‍या उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्‍ध झाले आहे. सकाळ व दुपारच्या दोन सत्रात परीक्षा घेतली जाणार आहे. संभाव्‍य गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रावर चित्रीकरण (व्हिडिओ शूटिंग) केले जाणार आहे. प्राथमिक स्‍तरावर १ ली ते ८ वी या इयत्तांवर शिक्षक होण्यासाठी टीईटी परीक्षा पात्र होणे गरजेचे असते. त्‍याअनुषंगाने २०२४ वर्षासाठीच्‍या परीक्षेचे आयोजन केले आहे.

राज्यातील १ हजार पेक्षा जास्त परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहेत. यामध्ये 3 लाख पेक्षा जास्त उमेदवार परीक्षेला सामोरे जाणार आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही (CCTV), बायोमेट्रिकद्वारे हजेरीसह इतरही उपाययोजना केल्‍या जाणार आहेत. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ही परीक्षा होत असल्‍याने परीक्षार्थींमध्ये उत्‍साहाचे वातावरण आहे.

परीक्षार्थींनी आपल्यासोबत प्रवेशपत्र, बॉलपेन (काळा, निळा) ओळखपत्राची मूळ प्रत (Original (आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड, वाहन चालक परवाना, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, शाळा, महाविद्यालयाचे अद्ययावत ओळखपत्र) सोबत ठेवणे अत्यावश्यक आहे. या व्यतिरिक्त कोणतेही साहित्य सोबत आढळून आल्यास परीक्षार्थींवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. तसेच परीक्षेला जाण्याआधी प्रवेशपत्रावरील सूचनांचे काटेकोर अवलोकन करण्यात आवाहन नवेपर्व न्यूज तर्फे करण्यात येत आहे. सर्व परीक्षार्थींना हार्दिक शुभेच्छा..!



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या