मंगळग्रह सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम
अमळनेर : धार्मिकतेसोबतच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे पर्यावरण संरक्षणार्थ जनजागर भव्य शोभायात्रेसह वृक्षदिंडीचे आयोजन 14 रोजी करण्यात आले होते.
संत श्री सखाराम महाराज वाडी येथून सकाळी 9 वाजता प्रांताधिकारी नितीन मुंडावरे , पोलीस निरीक्षक विकास देवरे व मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी श्रीफळ फोडून शोभायात्रेचे उद्घाटन केले. मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी, तुषार दिक्षित, जयेंद्र वैद्य, गणेश जोशी, वैभव लोकाक्षी, मेहुल कुलकर्णी, अक्षय जोशी, शुभम वैष्णव यांनी पौरोहित्य केले. हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे हे पुजेचे यजमान होते.
शोभात्रेत मतदान जनजागृती रथ, भगवान श्री विष्णू, माता श्री तुलसी यांच्या प्रतिकात्मक मुर्तींचा रथ, डोक्यावर कलशधारी डी. आर. कन्या शाळेच्या विद्यार्थींनी, संत श्री सखाराम महाराज वेध पाठशाळचे विद्यार्थी, श्री सखाराम महाराज वारकरी अध्ययन करणारे विद्यार्थी, खेडी व्यवहारदडेचे श्रीकृष्ण भजनीमंडळ, आनोरे येथील गुरूदेव भजनीमंडळ, नंदगाव येथील वेदमाता भजनीमंडळ, तासखेडा, अंतुर्ली, खेडी, निंभोरा येथील वारकरी संप्रदायाचे पथक, जी. एस. हायस्कुलचे छात्रसेनेचे विद्यार्थी, लोकमान्य विद्यालयाचे विद्यार्थी, साने गुरुजी नुतन माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, उस्ताद बाबूभाई यांची अलीम अँड पार्टी यांच्या सहभागासह वेतोशी, रत्नाागिरी येथील शिवकालीन मर्दानी चित्तथरारक कसरतीचे खेळ करणारे कसरतपटू शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरले. संस्कृती आणि परंपरेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी खराखूरा फलधारी आम्रवृक्ष तसेच माता-भगिनी पारंपरिक भारतीय वेषात होत्या आणि त्यांच्या डोक्यावर सजवलेला कलश तसेच छोटेखानी तुलसी वृंदावन होते. दरम्यान मिरवणुकीवर सर्वत्र फुलांची उधळण केली जात होती. पी. एन. ज्वेलर्स, लक्ष्मीनारायण ट्रेडर्स,रोटरी क्लब , लक्ष्मणदास पंजाबी आदी दात्यांनी चहापान, फराळी चिवडा व बिस्किटांची सोय केली होती.
संत सखाराम महाराज वाडी संस्थान येथून शोभायात्रेची सुरूवात होत दगडी दरवाजातून तिरंगा चौक- कोंबडी बाजार- नगरपालिकेच्या पाठीमागून सुभाष चौक- राणी लक्ष्मीबाई चौक मोठा बाजार फरशी पूल- चोपडा नाका मार्गे श्री मंगळग्रह मंदिर येथे शोभायात्रेची सांगता झाली.
यावेळी माधुरी पाटील , करुणा सोनार , उज्वला शिरोडे ,झेप फाउंडेशनच्या रेखा चौधरी, पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे सुभाष चौधरी, साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील, जी.एस.हायस्कूलचे मुख्याध्यापक बी.एस.पाटील, पंकज मुंदडे,ताहा बुकवाला,महेश कोठवदे ,विलास चौधरी, डी. ए. धनगर, डी. के. पाटील, समाधान पाटील, महेश कोठावदे, मुकेश पाटील, प्रियंका पवार, वैशाली पाटील, गायत्री पाटील, दीपाली पाटील आदी उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे, जयश्री साबे, मंगल सेवेकरी उज्वला शाह ,प्रकाश मेखा, आशा महाले, आनंद महाले, विनोद कदम, बाळा पवार, आशिष चौधरी, उमाकांत हिरे, ए. डी. भदाणे, मनोहर पाटील, राहुल पाटील,ग्रिनरी कन्सल्टंट सुबोध पाटील, निलेश महाजन आदींनी मेहनत घेतली.
0 टिप्पण्या