Subscribe Us

शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्राथमिक शाळेत वकृत्व स्पर्धा संपन्न!


जळगाव: शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सर्व प्राथमिक शाळेतील इयत्ता 3 री व ४थी विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा, वकृत्व व बोलण्याची कला पुस्तक वाचण्याचे आवड निर्माण व्हावी या उद्देशाने या वर्षापासून ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. ही स्पर्धा प्राथमिक व अंतिम फेरी अशा दोन फेरीत घेण्यात आली. स्पर्धेसाठी विषय १) अशी आहे माझी आई २) माझा आवडता सण ३) मोबाईल बंद झाले तर ४)आरोग्यम् धनसंपदा याप्रमाणे होते. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ.भारती गोडबोले व सौ.शैलजा पप्पू यांनी काम पाहिले. प्रथम क्रमांक हेमल ढोले. सौ.सु.ग.देवकर प्रायमरी स्कूल द्वितीय क्रमांक उजेर न्हावकर सौ.सु.ग.देवकर प्रायमरी स्कूल तृतीय क्रमांक गुंजन सोनवणे ज.प्र.कुलकर्णी प्रा.स्कूल उत्तेजनार्थ मानसी वाघ ज.प्र. कुलकर्णी प्रा.शाळा यांनी क्रमांक मिळवले. स्पर्धेनंतर समारंभाचे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड.श्री सुशीलदादा अत्रे यांच्या हस्ते विजेत्यांना मेडल व बक्षीस देण्यात आले. सदर कार्यक्रमास शि.प्र.मंडळाचे सचिव मा.अभिजीत देशपांडे, सहसचिव मीरा गाडगीळ विद्यासमिती प्रमुख प्रा.शरदचंद्र छापेकर सर समन्वयिका प्रमुख सौ.पद्मजाताई अत्रे, सौ.प्रिया देशपांडे, सौ.विजयालक्ष्मी परांजपे, सौ.रेवती शेंदुर्णीकर आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक याप्रसंगी उपस्थित होते. सूत्रसंचालन इंद्रायणी आंबेकर यांनी केले तर कल्पना पवार यांनी परिचय करून दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या