व्यापारी किरण वाणी यांच्या स्तुत्य दातृत्वातुन उलन स्वेटर वाटप
पारोळा: आज दि. ४ सप्टेंबर २०२४ रोजी जि प प्राथ शाळा क्र ३ पारोळा येथे शाळेचे उपक्रमशिल मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांच्या लोकसहभागातुन शाळा विकास या संकल्पनेच्या विनंतीने पारोळा शहराचे व्यापारी व वाणी समाजाचे अध्यक्ष किरण पंजु वाणी यांच्या स्तुत्य दातृत्वातून शाळेच्या ३६ विदयार्थ्यांना छान सुंदर उच्चप्रतीचे वुलन स्वेटर वाटप करण्याचा उपक्रम उत्साहात संपन्न झाला . या उपक्रमाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील, गट शिक्षणाधिकारी तर प्रमुख पाहुणे म्हणुन चंद्रकांत चौधरी , शालेय पोषण आहार अधिक्षक , ग्रेडेड मुख्याध्याक रविंद्र पाटील , प्रकाश बाबुराव शिंपी , दिलीप शिरुडकर , जगदिशशेठ गुजराथी , गुणवंतराव पाटील , हेमकांत मुसळे , महेंद्र कोतकर , पप्पुदादा कोतकर , रविंद्र शेंडे , किशोर सोनवणे , प्रदिप सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. अगोदर विद्यार्थीनींनी उपस्थित सर्व मान्यवरांचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले . या वेळी अगोदर गुणवंतराव शिवदास पाटील , मुख्याध्यापक धाबे शाळा हे आपल्या प्रदिर्घ सेवेतून सेवा निवृत्त झाल्याने त्यांचा शाल, श्रीफळ व भेट वस्तु देत निरोप व सत्कार करण्यात आला . नंतर या उपक्रमाचे दाते किरण पुंजु वाणी यांच्या वाढदिवस निमित्त विद्यार्थ्यांनी त्यांच्या हस्ते वाढ दिवस केक कापुन त्यांचे अभिष्टचिंतन केले . यावेळी शरद वाणी यांनी किरण वाणी यांच्या दातृत्व गुणांचे कौतुक करीत ते सदैव समाजात पाहिजे ती मदत देण्यास तयार असतात व त्यांच्या सामाजिक भावनेचे कौतुक केले . तसेच गुणवंतराव शिवदास पाटील यांनी आपली सेवा अतिशय उत्तम पार पाडुन शिक्षकांसाठीही त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला. यावेळी किरण वाणी यांनी मी जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना मदतीसाठी सदैव तयार असुन आज गोरगरीब बालकांना वेळेवर वुलन स्वेटर देतांना त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद मला लाख मोलाचा आनंद व समाधान देत आहे असे प्रतिपादन केले .
यावेळी आपल्या अध्यक्षिय भाषणात विश्वासराव पाटील यांनी किरण वाणी यांच्या दातृत्व गुणांची प्रशंशा करून जि प च्या गरीब विदयार्थ्यांना मायेची ऊब दिली म्हणुन त्यांचे आभार व अभिनंदन केले . असेच आमच्या तालुक्यातील इतर शाळांनाही शक्य तो मदतीचा हात दया असे अवाहन उपस्थित सर्व मान्यवरांना केले . सर्वच उपस्थित मान्यवरांनी किरण वाणी यांचे सामाजिक कार्य व गुणवंतराव पाटील यांचे शैक्षणिक कार्य याबाबत गौरवपुर्ण विचार मांडले . याप्रसंगी किरण वाणी यांनी बालकांना मिष्टान्न भोजन देवुन त्यांचा आनंद द्विगुणीत केला . सुत्रसंचलन मनवंतराव साळुंखे यांनी तर अर्चना सेवलिकर यांनी आभार प्रदर्शन केले .
0 टिप्पण्या