धरणगाव: साळवे येथील विद्यालयात ग्राम सुधारणा मंडळाचे सदस्य बाळू दादा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नंतर शोभायात्रेने वि का सोसायटी येथे चेअरमन विकास ब-हाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नंतर शासकीय ध्वजारोहण ग्रामपंचायतीचे माध्यमाने झेंडा चौक येथे सरपंच आशाताई कोल्हे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी झेंडा चौकामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. नंतर विद्यार्थ्यांनीं देशभक्ती पर स्वातंत्र्यावर सुंदर असे भाषणे सादर केले आणि टाटा इंडिया बिल्डिंग तर्फे विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धेनिमित्त बक्षीस देण्यात आले. मेडल, प्रमाणपत्र आणि जोराबजी टाटा यांच्या आत्मचरित्रपर ग्रंथ ई.प्रथम, द्वितीय, त्रुतीय असे दोन्ही गटातील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. यावेळी ग्राम सुधारणा मंडळाचे चेअरमन, शालेय समितीचे चेअरमन, सर्व कार्यकारी मंडळाचे सदस्य, सर्कल ऑफिसर, तलाठी आप्पा, ग्रामसेवक, मराठी मुलां-मुलींच्या शाळेचे विद्यार्थी व शिक्षक, विविध संस्थाचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सरपंच व सर्व पदाधिकारी, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे कौतुक केले. स्पर्धेमधील विद्यार्थ्यांना बक्षीस दिले. शाबासकीची थाप दिली व शुभेच्छा दिल्या. यावेळी साळवे इंग्रजी विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेचे शिक्षक व शिक्षिका, आशाताई, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, ग्रामपंचायतचे कर्मचारी व बालगोपाल ज्येष्ठ-श्रेष्ठ नागरिक, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही के मोरे यांनी केले. प्रास्ताविक बी आर बोरोले यांनी केले.
0 टिप्पण्या