Subscribe Us

मुंदडा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला राख्या बनविण्याचा स्वनिर्मितीचा आनंद

अमळनेरः स्व.श्री.मधुसूदन सुरजमल मुंदडा माध्यमिक विद्यालय अमळनेर शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या तयार केल्या व स्वनिर्मितीचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी सुंदर व कलात्मक राख्या तयार केल्या. यात तिरंगा राख्या चे प्रमाण जास्त होते. विविध सीडबाँल्स राख्या मध्ये टाकण्यात आले व पर्यावरण पुरक राख्या देखील तयार करण्यात आल्या. राख्या बनवितांना विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. ही संकल्पना शाळेच्या उपशिक्षिका सौ.नेहा पाटील मँडम यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली असता विद्यार्थ्यांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मा. मुख्याध्यापक श्री. धनराज महाजन यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचे महत्त्व सांगितले. मा.श्री.सुनिल पाटील सर, मा.श्री.किशोर पाटील सर व राजेद्र महाजन सर या शिक्षकांनी देखिल बहीण भावाच्या नात्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या राख्यांमधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले.

1️⃣ मनिष प्रकाश सोनवणे - 9 वी - प्रथम
2️⃣ कु. शितल रोहीदास जाधव - 9 वी - द्वितीय
3️⃣ राज रविंद्र शिंगाणे - 8 वी - तृतीय

या विद्यार्थ्यांंचा प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आला.
परीक्षक म्हणून मा. श्री. गोपाल पाटील सर व मा. श्री. राहुल भदाणे सर यांनी कामकाज सांभाळले. सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या शाळेच्या उपक्रमांबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.प्रकाशभाऊ मुंदडा व सर्वच संचालक मंडळ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या