अमळनेर : सामाजिक न्याय मंत्रालयाच्या याच्या सूचनेनुसार विकसित भारत का मंत्र भारत हो नशे से मुक्त या संकल्पनेवर आधारित भारताला अमली पदार्थ मुक्त बनविण्याच्या दृष्टीने व मादक पदार्थाच्या गैरवापराचा प्रतिबंध करण्याकरता नशा मुक्त भारत अभियान प्रताप महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे राबविण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकांनी अमली पदार्थ विरुद्ध प्रतिज्ञा घेतली. महाविद्यालयाचे प्राचार्य व खानदेश शिक्षण मंडळाचे चिटणीस डॉ. अरुण जैन यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आपल्या आजूबाजूला व्यसनाधीन झालेल्या सर्वांना योग्य मार्गदर्शन करून विडी, तंबाखू, सिगारेट व अमली पदार्थांची नशा न करण्याचे आवाहन केले. युवा पिढी व्यसनाधीन होत आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी जागरूक राहावे. नशेच्या आहारी जावू नये. युवा पिढी सक्षम देश घडवते. आपल्या परिवाराचाही विचार करावा. सुजाण व यशस्वी नागरिक बनावे. व्यसनांनी आयुष्य उध्वस्त होत असते. पालकांनीही मुलांकडे लक्ष ठेवावे. असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी यावेळी निरोगी जीवन जगण्याची शपथ घेतली. याप्रसंगी खानदेश शिक्षण मंडळाचे सहसचिव प्रा.डाॅ.धीरज वैष्णव, उपप्राचार्य प्रा.डॉ.अमित पाटील, प्रा.मोरे, प्रा.भाग्यश्री जाधव तसेच यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.हेमंत पवार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.सुनील राजपूत यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या