अमळनेर: शहरात सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे आदर्श शैक्षणिक संकुल १९६५ पासून लोकमान्य शिक्षण मंडळाने विकसित केले आहे. बाराशे पर्यंत शाळेची विद्यार्थी संख्या असल्याचे कळाले. आनंद वाटला. सर्वत्र इंग्रजी माध्यम संदर्भात आकर्षण असताना मराठी माध्यमातून शिक्षण देण्याचा यशस्वी प्रयत्न लोकमान्य शिक्षण मंडळ करीत आहे. या संस्थेची आधुनिक संगणक तंत्रज्ञानासाठी पुढील वाटचाल आनंददायी आहे त्यासाठी मी शुभेच्छा देतो. असे गौरवोद्गार नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी व्ही.मुरलीधरन राज्यसभा खासदार निधीतून साकारलेल्या संगणक कक्षाची उद्घाटन करताना मांडलेत. यावेळी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू सोनवणे व राजेश पांडे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान ज्येष्ठ संचालक प्राध्यापक डी.डी.पाटील सर यांनी स्वीकारले होते. याप्रसंगी शहरातील डॉक्टर अनिल शिंदे, दिलीप रामू पाटील, नीरज अग्रवाल, सौ.वाघ पलांडे मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते. चिटणीस विवेकानंद भांडारकर यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचाली संदर्भात प्रास्ताविक केले. संचालक वसंत बापू पाटील श्री.नवसारीकर सर प्रा.डॉ.प्रभाकर जोशी यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
0 टिप्पण्या