Subscribe Us

लोकमान्य विद्यालयात अनोखा स्वातंत्र्यदिन साजरा

अमळनेर: लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयात स्वातंत्र्यदिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी प्रथम संस्थेचे चिटणीस विवेकानंद भांडारकर यांच्या हस्ते सकाळी ७ वाजून १५ मिनिटाला ध्वजारोहण करण्यात आले. तद्नंतर भारतमातेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर हरितसेना उपक्रमांतर्गत लोकमान्य विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वृक्षांना आपले भाऊ मानून राखी बांधून वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला. या कार्यक्रमाला लोकमान्य शिक्षण मंडळाचे चिटणीस विवेकानंद भांडारकर, कार्याध्यक्ष प्रा.अरविंद फुलपगारे, कार्योपाध्यक्ष राजेंद्र खाडिलकर, लोकमान्य विद्यालयाचे चेअरमन प्रा.डाॅ.प्रभाकर जोशी, नवीन मराठी शाळेचे चेअरमन राजेंद्र नवसारीकर तसेच लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर महाजन, हरितसेना प्रमुख शिक्षिका सायली देशपांडे, नवीन मराठी शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र मोरे तसेच तिनही शाळांचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवीन मराठी शाळेचे शिक्षक किरण ठाकूर यांनी केले तर उज्ज्वल मार्कंडेय यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या