शिक्षकांनी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून गुणवत्ता विकास करावा.... मा ना गुलाबराव पाटील
धरणगाव: शाळेच्या विकास करण्यामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते त्यासाठी प्रत्येक शिक्षकांनी नव्या तंत्रज्ञानासह अद्यावत राहावे, ड्रेस कोड वापर करावा, पायी शिक्षणाला जाणाऱ्या मुलींना हजार सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे. जि प शाळांच्या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी आरो मशीन बसविण्यात येणार आहे. डीपीटीसी अंतर्गत वॉल कंपाऊंड काम सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक शाळेने गुणवत्ता वाढीसाठी व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कसोशीने प्रयत्न करावेत म्हणजे आपल्याला विभागीय पातळीवर पारितोषिक मिळवता येईल. त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकास, आनंददायी शनिवार, परिसबाग निर्मिती आणि विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी दिलेली अध्ययन निष्पत्ती साहित्यवापर, विविध स्पर्धांमध्ये, क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करावा असे प्रतिपादन मा ना श्री गुलाबरावजी पाटील, स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री, जळगाव व बुलढाणा जिल्हा पालकमंत्री यांनी प्रतिपादन केले. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी संख्या वाढवा, मूलभूत सुविधा आम्ही पुरवण्यास तयार आहोत. त्यांचा गुणवत्ताविकास व्हावा, त्यांनी दुसऱ्या बाहेर गावाला इंग्लिश मीडियम च्या शाळेमध्ये जाऊ नये. पूर्ण शिक्षक भरण्याच्या आम्ही प्रयत्न केलेला आहे.शिक्षणात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. कंपाऊंड, लाईट, कम्प्युटर इत्यादी सोयी सुविधा आपल्याला शासन पुरवण्यास तयार आहे म्हणून आपण विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ करावी असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी भावना भोसले मॅडम यांनी केले तालुकास्तरावरील विविध योजना, उपक्रमांची माहिती सांगितली. आनंददायी शनिवार परसबाग निर्मिती, मुख्यमंत्री माझी शाळा-स्वच्छ शाळा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकास याकडे लक्ष द्यावे असे सांगितले. याप्रसंगी गटविकास अधिकारी सुशांत आबा पाटील तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, मुख्याधिकारी जनार्दन पवार, इंदिरा कन्या हायस्कूल चे सचिव सी के पाटील, साळवा हायस्कूलचे चेअरमन डॉ गिरीश नारखेडे, डी ओ पाटील, भानुदास विसावे,मोतीआप्पा पाटील, सर्व केंद्रप्रमुख, विविध शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक आणि विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
*मुख्यमंत्री माझी शाळा अभियानांतर्गत खाजगी व्यवस्थापना मध्ये बक्षिसे*******
*प्रथम - इंदिरा माध्यमिक विद्यालय धरणगाव*
*द्वितीय - आर.डी.पाटील माध्य.विद्यालय, पथराळ*
*तृतीय- साळवे इंग्रजी विद्यालय साळवे*
****जि प प्राथमिक विभागांतर्गत---
*प्रथम - झुरखेडा जिल्हा परिषद शाळा, द्वितीय - भोणे जिल्हा परिषद शाळा, तृतीय - अनोरे जि प प्राथमिक शाळा* यांना बक्षिसे देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण चव्हाण यांनी केले व आभार प्रदर्शन प्रमोद पाटील यांनी केले.
0 टिप्पण्या