Subscribe Us

साळवे इंग्रजी विद्यालय येथे "आंतरराष्ट्रीय योग दिवस" प्रात्यक्षिकासह साजरा!


योगा, व्यायाम आणि संतुलित आहार केल्याने शरीर व मन तंदुरुस्त राहते- चेअरमन डॉ गिरीश नारखेडे


साळवे (धरणगाव) प्रतिनिधी:- नियमित व्यायाम, योगासने कराल तर तब्बेत तंदूरूस्त राहिल डॉक्टरांकडे जाण्याची गरज पडणार नाही.  असे मुख्याध्यापक एस डी मोरेंनी सांगितले. साळवे इंग्रजी विद्यालय ता.धरणगांव येथे २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे प्रास्ताविक शाळेतील योगशिक्षक पी बी पाटील यांनी केले. नियमित योगासने व प्राणायाम केल्याने आपले शरीर तंदुरुस्त राहते हा मूलमंत्र योगगुरू पाटील यांनी दिला.
            सर्वप्रथम योग दिनाची सामुहिक प्रार्थना घेण्यात आली. यानंतर शाळेतील योगशिक्षक पी बी पाटील यांनी विद्यार्थ्यांना योगासने व प्राणायामाचे विविध प्रकार प्रात्यक्षिक करून दाखवले. प्रात्यक्षिक करत असतांना शाळेतील क्रीडा शिक्षक बी आर बोरोले यांनी विविध प्राणायाम व योगासने यांचे फायदे व तोटे विद्यार्थ्यांना समजून सांगितले. विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिके करण्याचा आनंद घेतला व त्याचे फायदे समजून घेतले. समारोपप्रसंगी सामूहिक शांतिमंत्राचे पठण केले.

          आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत शाळेचे मुख्याध्यापक एस डी मोरे तसेच शाळेतील शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर बंधू - भगिनी कर्मचारी वृंद यांनी देखील योगासने व प्राणायाम केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या