Subscribe Us

श्रृती नेटके चे अभियांत्रिकी (स्थापत्य)परीक्षेत घवघवीत यश संपादन!!


जळगाव: जिद्द असली की तुमचे यश कुणीही हिरावू शकत नाही. याची प्रचिती नुकताच एम. पी. एस. सी अभियांत्रिकीत पहिल्या क्रमवारीत येण्याचा लाभ श्रृती नेटके हया विद्यार्थिनीच्या यशाने अनुभवास आला. मूळ पाथरी ता. जळगाव येथील ऑपरेटर श्री राजेंद्र नेटके यांची मुलगी श्रृती ने रावेर ह्या निमशहरी भागात अदयावत कोणतीच सुविधा नसताना केवळ ऑनलाईन व सेल्प स्टडी करुन यश मिळवून दाखविले. लहानपणापासून आपला वेळ अभ्यासासाठी दिला पाहिजे याची कास धरून इंजिनिअरींग ची वाट धरली. आईवडील त्या क्षेत्रातले नसतांना घराची एक शिस्त त्या मुलांना होती. सामाजिक कामात सदैव योगदान देणारे वडील आईने दिलेले संस्कार याची शिदोरी घेऊन मुले शिकली. भाऊ अभिजित ही एम. बी. बी. एस ला आहे. मुली शक्यतो सिव्हील इंजीनिअर साईड निवडत नाही परंतू अनेक अडथळ्यांवर मात करुन श्रृतीने हा इतिहास रचला आहे. तिला यापुढे ही उच्च पदवी मिळवायची आहे. अगदी कमी बोलणारी मुलगी म्हणून ती नातेवाईक लोकात ओळखली जात होती. आपल्या अभ्यासाला तिने प्राधान्य दिले. तिला विचारले असता अभ्यास कसा केला तर ती सांगते थोडया अभ्यासाची सवय तुम्हाला सातत्य ठेवल्यास मार्ग कठिण जात नाही. विद्यार्थ्यांना ती सल्ला देते की, ऑनलाईन ला बरेच मार्गदर्शन उपलब्ध आहेत. काही महत्वाची पुस्तके ठेवल्यास यश हुलकावणी देत नाही. टिव्ही, मोबाईल, लग्न, सोहळे याला अभ्यास करतांना महत्व देऊ नका. जास्तीत जास्त आपल्या मार्गातील अडथळे दुर करण्याचा प्रयत्न करा.तिने मिळवलेल्या यशाने सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे. नातेवाईक, आप्तेष्ट घरी जाऊन सत्कार करित आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या