अमळनेर: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मारवड येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज जन्मोत्सव सार्वजनिक शिव जयंती उत्सव समिती मारवड यांच्याकडून आयोजन करण्यात आले. शिव जयंती निमित्ताने मासाहेब जिजाऊ यांची वेशभूषा जान्हवी हेमकांत साळुंखे व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा मंथन चंद्रशेखर साळुंखे यांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी ग्रामपंचायत मारवड येथील चौकात विद्यार्थ्यांचे वकृत्व व नृत्य या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . यात वकृत्व स्पर्धेसाठी 20 मुली व 12 मुलांनी सहभाग नोंदवला. यात प्रथम क्रमांक जान्हवी हेमकांत साळुंखे , द्वितीय क्रमांक मृणाली भूषण साळुंखे, तृतीय क्रमांक मयुरेश अमोल निकम, चतुर्थ क्रमांक प्रज्ञा दिग्विजय साळुंखे व उत्तेजनार्थ म्हणून दिव्यानी समाधान शिंदे आणि रोशनी किरण शिंदे यांना सार्वजनिक शिवउत्सव समिती मारवड यांच्याकडून ट्रॉफी, प्रमाणपत्र व कंपास भेट देण्यात आली. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना कंपास भेट देण्यात आली. तसेच या कार्यक्रमांमध्ये मुलींनी वैयक्तिक व समूह नृत्य सादर केले. व मुलांनी समूह नृत्य सादर केले. कार्यक्रमास सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व सार्वजनिक शिक्षण समिती सदस्य ,पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सार्वजनिक शिव जयंती उत्सव समितीतील सर्व सदस्य यांचे शाळेच्या वतीने आभार व ऋण व्यक्त करण्यात आले.
0 टिप्पण्या