धरणगाव प्रतिनिधी: साळवे इंग्रजी विद्यालय संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनात्मक व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न. यावेळी ज्येष्ठ शिक्षक एस डी मोरे प्रबोधन करताना म्हणाले संत रोहिदासांचा जन्म 1376 ला वाराणसी जवळ मांडुरगढी उत्तर प्रदेश मध्ये झाला. समाज सुधारक संतांच्या यादीत महान क्रांतिकारी म्हणून संत रोहिदासांचे नाव घेतले जाते. भारतभर फिरून सामाजिक बांधिलकी, जातीय सलोखा टिकवण्यासाठी त्यांनी एकतेचा संदेश दिला. गुरु ग्रंथसाहेब मध्ये त्यांच्या 41 कविता आजही लोकप्रिय आहेत. ते संत कबीरांचे समकालीन होते. त्यांना राजकन्या संत मीराबाई यांनी गुरु मानले होते. असे प्रतिपादन केले. अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षक जी व्ही नारखेडे होते. सूत्रसंचलन व्ही एस कायंदे यांनी केले. आभार प्रदर्शन एस व्ही राठोड यांनी केले. यावेळी एस पी तायडे, सौ एन बी पाटील, सौ आर पी नेहेते, श्रीमती जी एस पाटील क्रीडा शिक्षक भूषण बोरोले व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या