जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
नाशिकः क्रीडा सह्याद्री फाउंडेशन नाशिक व नाशिक टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती निफाड येथील सरस्वती मैदानावर उत्साहात संपन्न. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूतकाळाकडे पाहिले की भविष्यकाळ घडवण्याची वर्तमान दृष्टी प्राप्त होते अशा शौर्याचा इतिहास या मातीत घडविणाऱ्या तेजस्वी सूर्याला क्रीडा सह्याद्री कडून त्रिवार मानाचा मुजरा. क्रीडा सह्याद्री सरस्वती ग्राउंडवर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवजयंती खेळाडू व प्रशिक्षक तसेच पालक यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली. या शिवजयंतीच्या सोहळ्या प्रसंगी नाशिक टेनिस क्रिकेट असोसिएशन सचिव व क्रीडा सह्याद्री अध्यक्ष विलास गायकवाड, माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य सचिव विनोद गायकवाड, शिक्षक संग्राम सानप, राजाराम नागरे, कला शिक्षक नितीन पोकळे, राज्य आणि राष्ट्रीय खेळाडू इत्यादी उपस्थित होते नाशिक टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव व क्रीडा सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष विलास गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी मार्गदर्शन करत असताना छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य हा भारताच्या इतिहासातील एक दैदीप्यमान अध्याय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची, सामाजिक आणि प्रशासकीय ध्येय धोरणे आजही आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्या जयंती दिनी त्यांच्या प्रति कृतज्ञता अर्पण करणे, हे सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे राज्यातील सर्वांनी ही शिवजयंती अतिशय उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात साजरी करावी असे मत मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा सह्याद्री फाउंडेशनचे सदस्य विनोद गायकवाड, राहुल कुलकर्णी, चेतन कुंदे, रमेश वडघुले, प्रतीक्षा कोटकर आदित्य खंडारे, कार्तिक मोरे आदित्य दरोडे इत्यादींनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या