अमळनेर: येथील स्व.श्री.मधुसूदन सुरजमल मुंदडा माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. स्व.श्री.एम.एस.मुंदडा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.धनराज महाजन सर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री.विशाल साळुंखे सर उपस्थित होते. विद्येची आराध्य देवता माता सरस्वती स्व.सौ.पद्मावतीआई व स्व.श्री.शामदादा यांचे प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमात तेजस्विनी महाजन, भूमिका अहिरे, प्रिती कोळी, हर्षदा विसपुते, आदिती शिंगाणे, आनंद पवार या विद्यार्थ्यांनी मनोगतातून शाळा व शिक्षकांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या, शालेय आठवणींना उजाळा दिला व मनोगत व्यक्त करतांना अनेक विद्यार्थी भावूक झाले. मा.सौ. नेहा पाटील मॅडम, मा.श्री.किशोर पाटील सर, मा.श्री.सुनिल पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेविषयी मार्गदर्शन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.मुख्याध्यापक श्री.धनराज महाजन सर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सांगितले की, आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेत संगत सोबत चुकली तर संपूर्ण आयुष्य उद्घवस्त होते. त्यामुळे संगत सोबत चुकू देऊ नका, परिश्रमाशिवाय यश मिळत नाही, शिक्षक व आई-वडिलांचे नाव मोठे करा असे मार्गदर्शन केले. इ.10 वी ची विद्यार्थीनी कु.भूमिका अहिरे हिला "आदर्श विद्यार्थीनी" म्हणून ट्राँफी व पुस्तक भेट देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.भुमिका अहिरे हिने केले. तर आभार कु.आदिती शिंगाणे हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
0 टिप्पण्या