जळगांव: येथील नुतन मराठा कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.डॉ.सौ.सरला चिमणकर-वानखेडे यांना नुकतेच कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने हिंदी विषयात विद्यावाचस्पती (P.hD) पदवी संपादन केल्याचे अधिसूचना पत्र प्र.कुलगुरू प्रा.डॉ.एस.टी.इंगळे सर यांचे हस्ते देण्यात आले. त्यांनी हिंदी विषयात सुप्रसिद्ध लेखिका "सुषम बेदी का उपन्यास साहीत्य-एक अनुशीलन" या विषयावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास प्रबंध सादर केला होता त्यांना एच.जे.थीम इकरा महाविद्यालयाचे प्रा.डॉ.श्री.राजेश भामरे सर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्या श्री.वानखेडे गुरुजी हौसिंग सोसायटी,जळगांव येथील रहिवासी श्री.भादूजी बालुजी वानखेडे यांच्या सूनबाई असून शेठ ला.ना.सा.विद्यालयातील जेष्ठ विज्ञान शिक्षक श्री.संजय वानखेडे यांच्या पत्नी होत. त्यांना भुसावळ येथील सेवानिवृत्त प्रा.डॉ.मधू खराटे, नुतन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.श्री.एल.पी.देशमुख व सहकारी शिक्षक व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सर्व कार्यालयीन स्टाफ चे उत्तम सहकार्य मिळाले.
0 टिप्पण्या