किमान, फक्त १०० कोटी लोक एका संकल्पनेवर एकाग्र झाले आहेत असं गृहीत धरलं तर १ अब्ज × १ अब्ज = ???? तेव्हढी शक्ती आपल्याला मिळेल. कधी? तर दिनांक – २२/०१/२०२२ रोजी सोमवारी दुपारी अयोध्येतल्या (ayodhya) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळेला जे जे कोणी ( कोणत्याही जाती धर्माचे असले तरीही। ) एकाग्र होऊन रामनामाचा उच्चार करतील, संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचा संकल्प, प्रार्थना करतील त्या सर्वांना इतकी मिळेल। या मागे विदेशींनी सांगितलेलं विज्ञानच आहे बरं। त्यांनी सांगितलं की आपला विश्वास बसतो म्हणून असं सांगावं लागतं। आणि या संकल्पनेला म्हणतात “रेझोनांसचं तत्व। मी वारंवार या बाबत सांगत आलो आहे। माझा तो जुना लेख तुम्हाला रेझोनांसची माहिती मिळावी म्हणून पुन्हा याच लेखात खाली देतो आहे। लेख पूर्णपणे नीट वाचा, खूप शेअर करा आणि तुम्हीही उत्तम लाभ घ्या!!!!
मित्रांनो २२ जानेवारीला भारत आणि संपूर्ण विश्वात जिथे जिथे श्रीरामांवर (shriram) विश्वास ठेवणारे, त्यांना ईश्वर मानणारे आहेत ते ते रामरक्षा स्तोत्र आणि रामाच्या विविध नामांनी रामाची स्तुती, पूजा, प्रार्थना करतील। ही संख्या जर शंभर कोटी इतकी आहे असं आपण गृहीत धरलं तर वर म्हंटल्याप्रमाणे अति प्रचंड अदृश्य वाटणारी पण खोलवर कार्य करणारी शक्ती आपल्या सर्वांना, म्हणजे जे जे कोणी या रामप्रभूंच्या प्रार्थनेत निमग्न झालेले असतील त्यांना मिळेल। अट इतकीच की तेव्हा “हे श्रीरामा, संपूर्ण विश्वाचं, माझं, माझ्या कुटुंबियांचं कल्याण कर। सर्वांना सद्बुद्धी दे। सर्वांना उत्तम आरोग्य, भरपूर आयुष्य, ऐश्वर्य आणि आयुष्यभर रुचकर अन्न पोटभर खायला आणि उत्तम जल प्यायला मिळू देत। सर्वांचं आयुष्य सुखासमाधानाने भरून जाऊ देत। सर्वांच्या मनातली दुष्टबुद्धी दूर होऊन सर्वांच्या चिंता, पीडा, कष्ट, दुःख यांचा नाश होऊन ही पृथ्वी जणू नंदनवन होऊ देत!” अशी प्रार्थना करायची आहे। एकाने हे मोठ्याने हे म्हणायचं। किंवा वाचून दाखवायचं। आणि नंतर सर्वांनी तथास्तु असं एकदम म्हणायचं। तथास्तु म्हणजे असंच होवो।
सर्वांचं कल्याण जेव्हा होईल तेव्हा होईल। पण तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम दिसायला लागतील। जगातील सर्व धर्माचार्य, सगळे संत यांनी प्रार्थनेचं महत्व वारंवार सांगितलं आहे। जगातील सर्व धर्मात याचसाठी एकत्रितपणे प्रार्थना केली जाते। आर्य सनातन वैदिक संस्कृती म्हणजेच हिंदू सनातन धर्मात सुद्धा पूर्वीच्या काळी मोठमोठ्या प्रार्थना सभा होत असत। आपण हिंदू ते आता विसरलो आहोत। आपण एकत्रित प्रार्थना करायला शिकायला हवं। त्याने समाज निकोप, सुदृढ, शक्तिशाली आणि आनंदी बनतो। आपणही जीवनात सुखी होतो।
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयाः
सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चित् दुःख भाग्भवेत्।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः। सर्वजण सुखी होवोत.
सर्वे सन्तु निरामयः। सर्वजण आरोग्यसंपन्न होवोत.
सर्वे भद्राणि पश्यन्तु। सर्वांना स्व-कल्याण दिसूं देत.
मा कश्र्चित् दुःख्ख भाग् भवेत्।। कोणालाही दुःख्खी व्हायला लागू नये।
असाच अजून एक शांतीमंत्र प्रार्थनांच्या वेळेस म्हंटला जातो। तो पुढीलप्रमाणे :-
ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः । स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः ॥ या श्लोकाचा अर्थ –
या श्लोकाची थोडी शब्द फोड करु या ;
भद्रम् कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रम् पश्येम अक्षभिः यजत्राः।
स्थिरैः अङ्गैः तुष्टुवांसः तनूभिः वि-अशेम देव-हितम् यत् आयुः ।
हे देवां ! आमच्यासाठी आपला कल्याणकारी हा शब्द आम्हाला आमच्या कानांनी ऐकू द्या।
हे देवा जो यज्ञविषयक विधीसाठी पात्र असेल आणि जो यज्ञ करतो त्याला आपल्या डोळ्यांनी कल्याणकारी आणि शुभ घटनांचे दर्शन होऊ द्या।
जो निरोगी इंद्रियांद्वारे आणि निरोगी शरीराद्वारे आपली स्तुती करीत आहे। आपली सेवा करण्यासाठी ( देवहितम् ) जी शंभर वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ निर्माते ब्रह्मा ( वैश्यम ) यांनी निश्चित केला आहे ती वयोमर्यादा आम्हाला प्राप्त होऊ दे।
अर्थात आपल्या शरीराची सर्व अवयव आणि इंद्रिये निरोगी आणि कार्यशील राहू द्या आणि आम्हाला शंभर किंवा अधिक दीर्घ आयुष्य लाभू द्या।
सह नौ भुनक्तु ।
सह वीर्यं करवावहै ।
तेजस्वि नावधीतमस्तु मा विदविशावै ।
ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥
ही प्रार्थना सुद्धा म्हणू शकता। याचा अर्थ आहे की “हे परमात्मा विद्यार्थी आणि शिक्षक किंवा इथे उपस्थित मी आणि सगळा संघ अथवा उपस्थित समुदाय असं आम्हा दोघांचं रक्षण कर। आम्हा दोघांच्या मनात एकमेकांच्या बद्दल विद्वेषाची भावना नसू देत आणि आमची मनं निर्मल होऊ देत। आम्हा दोघांचं पोषण कर। आम्ही दोघे ऊर्जा आणि शक्ति सहित कार्य करू।”
२२ जानेवारीला अयोध्या प्रभु रामललाची प्राण प्रतिष्ठा होईल। त्या दिवशी सर्वार्थ सिद्धि योग, अमृत सिद्धि योग आणि मृगशिरा नक्षत्र आहे। २२ जानेवारीला सोमवार आहे आणि हरि अर्थात् विष्णु मुहूर्त आहे जो ४१ वर्षांच्या नंतर आला आहे।
२२ जानेवारीला तीन शुभ योगांचा अद्भुत संयोग होतोय। २२ जानेवारीला पौष शुक्ल पक्षाची द्वादशी तिथि आणि मृगशीर्ष नक्षत्र आहे। तो पूर्ण दिवस सवार्थ सिद्धि योग और अमृत सिद्धि योग आहे। दिवस संपता संपता रवी योग सुरू होतोय। या सगळ्या योगांवर अभिजीत मुहूर्ता अंतर्गत रामललाची प्राणप्रतिष्ठा पार पडेल। या दिवशी चंद्रमा सुद्धा त्याच्या उच्च राशीत म्हणजे वृषभ राशीत असणार आहे।व
या दिवशी अभिजीत मुहूर्त दुपारी १३ वाजून १७ मिनिटांनी सुरू होऊन १२ वाजून ५९ मिनिटांच्या पर्यंत असेल। त्यातही अत्यंत शुभ मुहूर्त दुपारी १२ वाजून २९ मिनिट ८ सेकंदापासून १२ वाजून ३० मिनिटं आणि ३२ सेकंदा पर्यंत आहे। हा मुहूर्त अभिजीत मुहूर्ताच्या अंतर्गत आहे। हिंदू धर्मात शुभ कार्यासाठी अभिजीत मुहूर्त सगळ्यात उत्तम मानला जातो। म्हणून २२ जानेवारीचा दिवस निवडला गेला आहे।
ज्योतिष शास्त्रानुसार त्रेतायुगात प्रभु श्रीरामाचा जन्म अभिजीत मुहूर्तावर झाला होता। सोमवारी २२ तारखेला मृगशिरा नक्षत्रावर अभिजीत मुहूर्ताचा संयोग होतोय। म्हणूनच ही तिथी रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निवडली गेली आहे। अशी एक श्रद्धा किंवा भावना, इच्छा आहे की या मुहूर्तावर रामप्रभूंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर श्रीराम या मंदिरात सदैव विराजमान राहतील। प्राण प्रतिष्ठा मुहूर्त – त्यामुळे२२ जानेवारी २०२४ रोजी वर उल्लेख केलेल्या मुहूर्ताच्या वेळेमधल्या काळात श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल। म्हणजे आत्ता फक्त पाषाण रुपात म्हणजे दगडाच्या रुपात असलेल्या श्रीरामांच्या मूर्ती मध्ये वैदिक विधींच्या द्वारे प्राण फुंकले जातील। आणि मग त्या मूर्तीला देवत्व प्राप्त होईल।
अशा या अत्यंत सुंदर सोहळ्यासाठी तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा। सियावर रामचंद्र की जय।। राम लक्ष्मण जानकी! जय बोलो हनुमान की।।
खाली माझा रेझोनांसच्या तत्वाची माहिती देणारा लेख देतो आहे। नक्की वाचा।
Dr. हेमंत सहस्रबुद्धे उर्फ कलादास
दिनांक – २०/०१/२०२४ शनिवारी रात्री १०.००
मित्रांनो आज आपण “रेझोनांस” म्हणजे काय आणि त्याची शक्ती काय आहे या बद्दल माहिती घेऊ या. अतिशय महत्वाची पोस्ट आहे मित्रांनो.
आपण जेव्हा एकट्याने प्रार्थना करत असतो, उपासना करत असतो तेव्हा त्या उपासनेला व्यष्टी अथवा व्यक्तिगत केलेली उपासना म्हणतात. ही उपासना नित्य म्हणजे प्रतिदिन [ अरबी फारसी शब्द “रोज” ] केली जाणारी प्रार्थना, नैमित्तिक म्हणजे विशिष्ट कार्यासाठी केली जाणारी उपासना हे यातले मुख्य दोन प्रकार आहेत. हेच दोन्ही प्रकार समष्टी म्हणजे सामुहिक प्रार्थनेला सुद्धा लागू होतात. पण सध्या हिंदू बांधव सामुहिक प्रार्थना करणे विसरले आहेत. आणि कधी केलीच तर ती आरतीच्या स्वरूपात. आणि तीही आरडा ओरडा करत, चुकीच्या पद्धतीने आणि चुकीचे शब्द म्हणत. माझ्या गुरुदेवता परम पूज्य कलावती आई यांच्या हरीमंदिरात आणि इतर काही संप्रदायात जी नित्य सामुहिक प्रार्थना चालते ती वगळता हिंदू प्रार्थनेला एकत्र येत नाहीत ही अत्यंत वाईट आणि घातक गोष्ट आहे.
सर्वप्रथम आपण रेझोनांस म्हणजे काय ते पाहू. रेझोनांस….अर्थात एका वस्तूचे, अणूचे किंवा कोणत्याही एका गोष्टीचे स्पंदन दुसऱ्या एखाद्या गोष्टीशी जुळणे याला रेझोनांस असे म्हणतात.
१] मायक्रोवेव्ह च्या फ्रिक्वेन्सी बरोबर अन्नातील पाण्याची फ्रिक्वेन्सी जुळवली जाते आणि रेझोनांस उत्पन्न होऊन उष्णतेची निर्मिती होते आणि अन्न शिजते.
२] रेझोनांसचे हेच तंत्र संगीतातही वापरले जाते. ज्या वेळेस दोन तारांच्या कंपन पावणाऱ्या
Frequency किंवा वारंवारीता जुळते त्या वेळेस दुसरीही तार आपोआप कंप पावू लागते.
३] MRI अर्थात Magnetic Resonance Imaging या तंत्रज्ञानातही रेझोनांसचाच वापर केला जातो. पेशंटला ज्या Scanner खाली झोपवतात तो Scanner पृथ्वीच्या Magnetic Field ८००० पट जास्त शक्तीचे Magnetic
Field उत्पन्न करतो. पेशंटच्या शरीरातील हायड्रोजनचे अणूतील Protons या MF बरोबर अलाईन होतात म्हणजे MF च्या प्रमाणे जुळवून घेतले जातात. नंतर जेव्हा Redio
-Frequency त्यांच्यावर सोडली जाते त्यावेळेस हे Protons
MF च्या उभ्या दिशेत फिरायला लागतात. आणि Protons ची ही सगळी माहिती Redio
-Frequency च्या Coil कडे पाठवली जाते. ह्या Protons चे वेगवेगळ्या प्रकारच्या पेशीतील वर्तन हे वेगवेगळे असते. हे Protons पाण्यात मेद किंवा चरबीपेक्षा कमी वेगाने शांत होतात. ही माहिती साठवली जाते, ताडून पाहिली जाते आणि मग पेशंटला काय विकार असेल त्याचे निदान केले जाते.
आता आपण धर्मातील रेसोनांस कडे वळू.
जेव्हा भजन, प्रार्थना, उपासना यासाठी एका विशिष्ट देवाच्या मंदिरात, विशिष्ट गुरुंच्या दरबारात एका भावनेने जमलेले लोक प्रार्थना करतात तेव्हा तेथे जितके लोक असतील त्यांची शक्ती कमी न होता ती भूमिती श्रेणीने एकमेकांना मिळते. अर्थात ती १+१= २ अशी वाढत न जाता तेथे चार जण प्रार्थना करत असतील तर ४*४=१६ म्हणजे चार चोक सोळा पटीत वाढत जाते. याचा एकत्रित प्रार्थना करणारयांना इतक्या प्रचंड प्रमाणात लाभ होतो. याच तत्वाचा काही धर्मांमध्ये फार सुंदर उपयोग करून घेतला आहे. हिंदू धर्मातील आरतीमध्ये हेच अपेक्षित आहे. परंतु त्यात भक्तीपेक्षा गोंधळ आणि चुकीच्या आरत्या म्हणणे यामुळे फायदा होताना दिसून येत नाही. ओम सहनाववतु …..या प्रार्थनेत एकत्र येऊन कार्य करण्याविषयीच सांगितले गेले आहे. त्यात ऋषी म्हणतात की आपण एकत्र येऊन प्रार्थना करू, एकत्र भोजन करू, एकत्र कार्य करू आणि एका विद्वेषरहित समाजाची निर्मिती करून खूप मोठी कार्ये पार पाडू. पराक्रम करू. ही शिकवण आज आपण विसरलो आहोत. रस्त्यावरून जाता जाता एका हातानेच देवाला नमस्कार करून आपण आपले “कर्तव्य” पार पाडायला लागलो आहोत.
मन:शक्तीच्या परमपूज्य श्री विज्ञानानंदांनी [ पूर्वाश्रमीचे श्री. भिडे ] रेझोनांसचे फार छान उदाहरण दिले आहे. एकदा अमेरिकेतील एका शहरात लष्कराचे संचलन चालू असते. आणि हे संचलन करता करता हे जवान एका लष्करी पुलावरून जावू लागतात. आणि हा शक्तिशाली पूल जो प्रचंड मोठ्या, अवजड लष्करी वाहनांनी आणि रणगाड्यांनीही पडला नाही तो या एका सुरात, एका तालात, एका ध्येयाने प्रेरित झालेल्या सैनिकांच्या संचलनाने पडला. यातही कारणीभूत आहे हा रेझोनांसच …….
मला असे नेहमी वाटते की ज्ञानेश्वरांनी जेव्हा त्यांना कोणीच मडके दिले नाही तेव्हा स्वत:च्या पाठीवर मांडे भाजले होते तेव्हा हे रेझोनांसचे तत्व किंवा शरीरातील स्थिर विद्युत यापैकी कशाचा तरी वापर केलेला असावा. स्थिर विद्युत निर्माण होताना त्या विद्युत निर्माण करणारया वस्तुत उष्णता निर्माण न होता ती जी वस्तू जवळ आहेत त्यात होत असते. श्री ज्ञानेश्वर हे एक महान योगी होते. त्यांना हे अशक्य नक्कीच नव्हते. आपल्याला त्याचे कारण न कळल्याने तो चमत्कार वाटतो. तसेच ज्ञानेश्वरांचे स्वत:चे लग्न अर्थात विवाह झालेला नसूनही त्यांनी स्त्री, पुरुष, प्रणय, फुले, भुंगे अशा अनेक उपमा दिल्या आहेत. प्रेम प्रसंग आणि अशाच अनेक गोष्टींचे वर्णन केले आहे. फुलांच्या मनातले सांगितले आहे. ते त्यांना या सर्वांशी समस्पंद गती अर्थात रेझोनांस करता येत असल्यामुळेच होय. म्हणजेच ते इतर व्यक्ती आणि वस्तू यांच्याशी त्यांची स्वत:ची स्पंदगती जुळवू शकत होते.
मित्रांनो अशी ही शक्ती आपण चांगल्या कामासाठी उपयोगात आणणार आहोत का? मित्रांनो आपण भीमरुपी, रामरक्षा, तुळशीदासांचे बजरंग बाण, हनुमान चालीसा,, सप्तशती मधील काही मंत्र, गायत्री मंत्र मृतसंजीवनी मंत्र अशा अति शक्तिशाली मंत्रांचे एकत्रित पठण केले तर फार मोठी शक्ती निर्माण करू शकतो. नुसत्या चुकीच्या आरत्या ओवाळण्यापेक्षा असे काही केले तर फार चांगले होईल. एक शक्ती संपन्न समाज निर्माण होईल.
Dr हेमंत उर्फ कलादास…..
श्री. हेमंत उद्धव सहस्रबुद्धे,
७६२०७५००३४
0 टिप्पण्या