पुणे: शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढापुरी शताब्दी महोत्सव यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शताब्दी महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून विख्यात शिक्षण तज्ञ दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल प्रकल्पाचे संस्थापक श्री यजुर्वेद्र महाजन यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत बोलत होते. विद्यार्थी, युवक, उद्योजक, शिक्षक, युवा कार्यकर्ते यांना प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत विद्यार्थ्यांचे मनोबल कसे वाढवता येईल त्याच पद्धतीने मनोबल फॉडेशनचे चालले काम विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास या सर्व प्रश्नांची मुक्त संवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांनी त्यांना चांगला प्रतिसाद प्रतिसाद दिला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढापुरी यामध्ये आतापर्यंत स्कॉलरशिप मध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला, मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुकही केले व दिपप्रज्वलन करताना सदर विद्यार्थ्यांना संधी दिली. स्कॉलरशिपच्या मुलांना एमपीएससी परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षेत कशी तयार करावी याविषयी मौलिक काही टिप्स दिल्या. शताब्दी महोत्सवानिमित्त विद्यानिकेतन प्रशाला जुनिअर कॉलेज प्राथ. शाळा या सर्व विद्यार्थ्यांचे झालेल्या क्रीडा स्पर्धे चे बक्षीस वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
मा.उपसरपंच माणिक आबा गायकवाड मधुकर गायकवाड, चंद्रकांत दिघे, भगवान गायकवाड, सुनिल गायकवाड, संतोष वीर, संतोष दिघे व सहकारी यांचेही सहकार्य होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढापुरी मुख्याध्यापक सुदामलंघे, अनिल महाजन, लालासाहेब जाधव, संभाजी वाळके, उत्तम हुलगुंडे, विनायक पडवळ, राजू वेताळ, सौरभ नवसुपे, मीना कळमकर, संगिता तिरखुंडे, मनिषा वाळके, निता पडवळ या सर्व शिक्षकांनी कामाचे उत्तम नियोजन केले. सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लालासाहेब जाधव सर व प्रा.चंद्रकांत भोजने सर यांनी केले सर्वांचे आभार नितीन गायकवाड यांनी मानले.
0 टिप्पण्या