Subscribe Us

जिल्हापरिषद प्राथमिक कोंढापुरी शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न!


पुणे: आज दि.6 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथ. शाळा कोंढापुरी ता. शिरूर जि. पुणे शालेय शताब्दी महोत्सवा निमित बाल आनंद मेळावा घेण्यात आला. आज प्रथमच भाजीपाला असो किंवा खाऊ गल्ली याची चांगल्या प्रकारे उलाढाल झाली, एकंदरीत सर्व मुलांची उलाढाल बेरीज केली असता ५० ते ६० हजारपर्यंत  झाली. अनेक मुलांनी छान प्रकारे नफा मिळवला लहान मुलं असो अगर मोठे प्रत्येकाने या ठिकाणी सहभाग घेऊन आपला आनंद घेतला. आजचे विशेष म्हणजे अनेक मुलांचे आजोबा आजी सुद्धा आजच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. स्वप्निल भैया गायकवाड धनंजय तात्या गायकवाड, सुजाताताई गायकवाड, सरपंच अपेक्षा ताई गायकवाड, सौ सुषमा व संतोष आबा गायकवाड, मधुकरराव गायकवाड, नानासो गायकवाड व त्यांच्यासोबत असणाऱ्या सर्व सहकारी, पालक यांनी आज स्वतः खरेदी करून मुलांच्या मध्ये व ग्रामस्थांमध्ये उत्साह निर्माण केला. त्यामुळेच आज सर्वांचा आनंद ओसंडून वाहत होता. आजच खास एक वैशिष्ट्य म्हणजे आजोबा आजी प्रथमच यात्रेसारखा आनंद घेऊन खाऊ गल्लीमध्ये आज खाताना दिसले. नेहमीच नातवासाठी खरेदी करणारे आज त्या ठिकाणी आनंद घेत होते. आजोबा आजी यांनी सर्व शिक्षकांचे मुख्याध्यापक सुदाम लंघे व सहकारी शिक्षक  अनिल महाजन, उत्तम होलगुंडे, संभाजी वाळके, विनायक पडवळ, लालासाहेब जाधव, राजू वेताळ, सौरभ नवसुपे  संगीता तिरखुंडे, मनिषा वाळके, मीना कळमकर, निता पडवळ, सोनाली तांबे व श्री बोऱ्हाडे यांचे कौतुक केले व शुभाशिर्वाद दिला. व्यवस्थापन समिती सदस्य चंद्रकांत दिघे, भगवान गायकवाड, विजय दोरगे  सुनिल गायकवाड, योगेश दिघे, संतोष वीर, ग्रामपंचायत सदस्य राहुल दिघे व त्यांचे सर्व सहकारी यांनी खास कार्यक्रमासाठी नियोजन केले होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या