Subscribe Us

चैतन्य हरी माळी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानित!


पारोळा: कै. एच.पी.पाटील माध्यमिक विद्यालय,अंबापिंप्री ता.पारोळा जि. जळगाव येथील उपशिक्षक चैतन्य हरी माळी यांचे धुळे येथील नैसर्गिक मानवधिकार सुरक्षा परिषद फोरम तर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. अंबापिंप्री येथील कै. एच.पी.पाटील माध्यमिक विद्यालय  शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम, कोरोना काळात केलेली शैक्षणिक सेवा व विविध उपक्रमात कायम विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन करणारे चैतन्य हरी माळी यांच्या कार्याची दखल घेत धुळे येथील नैसर्गिक मानवधिकार सुरक्षा परिषद फोरम ने त्यांची आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे. दिनांक १ ऑक्टोबर रोजी धुळे येथील अजय लॉन्स, धुळे नगाव येथे पुरस्काराचे वितरण नैसर्गिक मानवधिकार सुरक्षा फोरम चे राष्ट्रीय अध्यक्ष गोरख देवरे  व व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रफुल सिताराम पाटील यांच्या शुभहस्ते या पुरस्काराचे वितरण झाले. उपशिक्षक चैतन्य हरी माळी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे तसेच सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या