Subscribe Us

तरूणांसाठी खुशखबर, अखेर कंत्राटी भरतीचा GR रद्द!


Contract workers recruitment Cancelled- राज्यातील वादात सापडलेला कंत्राटी भरतीचा जीआर अखेर रद्द करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जीआर रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. त्यामुळे आता स्पर्धा परीक्षांची (MPSC-UPSC) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी काॅंग्रेस, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेना गट, राष्ट्रवादी शरद (Sharad pawar) पवार गटावर टीका केली असून राज्यातील कंत्राटी भरतीचे 100 टक्के पाप हे त्यांचे असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

फडणवीस म्हणाले, कंत्राटी भरतीचा पहिला जीआर हा 2003 मध्ये काढण्यात आला त्यावेळी काॅंग्रेस आणि शरद पवार यांच्या सरकारमध्ये कंत्राटी भरती झाली. 2010 साली अशोक चव्हाण यांनी 6 हजार कंत्राटी भरतीचा जीआर काढला. त्यानंतर 2014 मध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना देखील कंत्राटी भरतीचा जीआर काढला होता. एमसीए, डाटा एन्ट्री ऑपरेटर अशा विविध पोस्ट त्यामध्ये होत्या. त्यानंतर 1 सप्टेंबर 2021 ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यावेळी कंत्राटी भर्तीचा जीआर काढण्यात आला, 15 वर्षाकरता कंत्राटी भरतीसाठी एजन्सी तयार करण्यात आली. आमचे सरकार आल्यानंतर एजन्सीचे रेट जास्त आहे हे माझ्या लक्षात आल्यानंतर यावर लक्ष घातले. कंत्राटी भरतीची सुरवात काँग्रेसने केली आणि आता त्याविरोधात आंदोलन करत आहे. त्यांच्या पापाचे ओझे आमचे सरकार उचलणार नाही म्हणून कंत्राटी भरती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत म्हंटले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या