Subscribe Us

स्व.श्री .एम .एस . मुंदडा माध्यमिक विद्यालयात 14 सप्टेंबर हिंदी दिवसाच्या निमित्ताने हिंदी "देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा'' व जनरल नॉलेज वर आधारित "चालता बोलता'' स्पर्धा संपन्न!


अमळनेर: स्व.श्री . एम .एस. मुंदडा माध्यमिक विद्यालयात 14 सप्टेंबर हिंदी दिवसाच्या निमित्ताने "हिंदी देशभक्तीपर गीत गायन ''स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत एकूण 11 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. देशावर आधारीत खूपच सुंदर देशभक्तीपर  गीत विद्यार्थ्यांनी म्हटली. विद्यार्थ्यांनी म्हटलेल्या गीतांमधून प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले .
कु  .रोशनी जाधव - इ .9 वी  - प्रथम
कु. भूमिका  अहिरे - इ.10वी  - द्वितीय 
चि.  जयेश  भोई   - इ  8 वी. - तृतीय 
प्रथम. द्वितीय, व तृतीय  आलेल्या विद्यार्थ्यांना  बक्षीस देण्यात आले. परीक्षक म्हणून मा. सौ .नेहा पाटील मॅडम व मा.श्री राजेंद्र महाजन सर यांनी कामकाज पाहिले. व त्यानंतर  जनरल नॉलेज वर आधारित "चालता बोलता'' कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांना  जनरल नॉलेज वर आधारीत दोन प्रश्न विचारण्यात आले. व दोघे प्रश्नांची उत्तरे बरोबर दिलेल्या विद्यार्थ्यास बक्षीस देण्यात आले. विद्यार्थ्यांनी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा खूपच आनंद घेतला .व वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. सदर कार्यक्रमाचे नियोजन हिंदी विषय शिक्षक सुनिल पाटील सर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या