अमळनेर: लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक रविंद्र मोतीलाल लष्करे आज दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ रोजी शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेप्रमाणे सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल लोकमान्य शिक्षण मंडळातर्फे सेवापूर्ती सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. रविंद्र लष्करे यांनी तब्बल ३३ वर्षे सेवा बजावली. या कार्यक्रमात लोकमान्य शिक्षण मंडळ तसेच संस्थेच्या तिन्ही शाळा लोकमान्य विद्यालय, नवीन मराठी शाळा, बालविकास मंदिर यांच्यातर्फे मुख्याध्यापक रविंद्र लष्करे यांच्या यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डी.डी पाटील होते. कार्यक्रमाला संस्थेचे चिटणीस विवेकानंद भांडारकर, पदाधिकारी प्रा.डाॅ.प्र.ज.जोशी, प्रा.र.रा.बहुगुणे, प्रा.डी.डी.पाटील उपस्थित होते. यावेळी संस्थेचे चिटणीस विवेकानंद भांडारकर, प्रा.डी.डी.पाटील, आत्माराम चौधरी, नवीन मराठी शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र मोरे, लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक रविंद्र लष्करे, ज्येष्ठ शिक्षक मनोहर महाजन, जे.के.चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकमान्य विद्यालयाच्या शिक्षिका सायली देशपांडे यांनी तर आभार विजय सुर्यवंशी यांनी मानले.
0 टिप्पण्या