Subscribe Us

नायगाव तालुक्यातील भांगेना राज्य शिक्षक पुस्कार जाहीर


नायगाव: शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍या नायगाव तालुक्यातील इज्जतगाव येथील प्राथमिक शिक्षक दीपक गुरुबसप्पा भांगे यांना राज्य शासनाचा २०२२-२३ चा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला. एक लाख रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी शुक्रवारी शासन निर्णयाद्वारे जाहीर झाली आहे. समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणार्‍या, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या, त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. २०२१-२२ पासून राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराच्या निकषात काही सुधारणा करण्यात आल्या. त्यानुसार हा पुरस्कार 'क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार' या नावाने दिला जात आहे. पुरस्कारासाठी शिक्षकांची अंतिम निवड करण्यासाठी २५ ऑगस्टला राज्य निवड समितीची ऑनलाईन बैठक झाली. निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार नायगाव तालुक्यातील इज्जतगाव येथील प्राथमिक शिक्षक दिपक गुरुबसप्पा भांगे यांची निवड केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या