Subscribe Us

शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, कजगाव शाळेच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला!


प्रतिनिधी कजगाव: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत असलेली स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्था हिंगोणे खुर्द संचलित, शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, कजगाव व शारदा विद्यानिकेतन(सेमी-इंग्रजी),कजगाव या शाळेत नेहमी विविध परीक्षांचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे सन 2022-23 या वर्षी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता नववी वर्गासाठीची जवाहर नवोदय ही प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने यात सहभाग घेतला होता. भारतातील काही विशेष, गुणी विद्यार्थांना या नवोदय विद्यालयांमध्ये शिकण्याची संधी मिळते! या नवोदय विद्यालयात शिक्षण मिळवण्यासाठी प्रत्येक वर्षी प्रत्येक जिल्ह्यातून 10000 हून अधिक विद्यार्थी नवोदयची परीक्षा देतात. जे विद्यार्थी मेरीट मध्ये येतात त्यांना 12वी पर्यंतचे शिक्षण मोफत शिक्षण दिले जाते. ज्याचा पूर्ण फायदा घेऊन विद्यार्थी देशाच्या विकासासाठी कार्यरत होतात. आतापर्यंत आपल्या शाळेतील एकूण 5 विद्यार्थ्यांची निवड नवोदय विद्यालयासाठी झालेली आहे. तसेच यावर्षी देखील हीच परंपरा कायम राखत आपल्या शाळेतील वाडे या छोट्याशा खेडेगावातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कु.नंदिनी विठ्ठलसिंग परदेशी या विद्यार्थिनीची नवोदय विद्यालय भुसावळ येथे निवड झाली आहे. त्याबद्दल शाळेकडून तिला हार्दिक अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा. तिला शाळेतील विषय शिक्षकांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. तसेच, संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री.सुनील चव्हाण सर आणि संस्थेचे सचिव श्री.नंदकुमार चव्हाण सर तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.निलेश मोरे सर आणि श्री.प्रदीप कुमावत सर व इतर विषय शिक्षकांचे देखिल मार्गदर्शन लाभले. सर्व परिसरातून तिचे कौतुक केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या