यावल : सातपुडा निवासिनी आई मनुदेवीचा शुक्रवारी यात्रोत्सव असल्याने खान्देशासह महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पावसाच्या शिडकाव्यात हजारो भाविक आई मनुदेवी चरणी नतमस्तक झाले.
भाविकांची दर्शनार्थ उसळली गर्दी
दरवर्षी पोळ्याच्या दुसर्या दिवशी असलेल्या या यात्रोत्सवात राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक-भक्तांनी दर्शनाकरीता येथे गर्दी करतात. आडगाव, ता.यावल जवळील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या खान्देशाचे कुलदैवत आई मनुदेवी मंदिरात शुक्रवारी मोठ्या उत्साहात यात्रोत्सव झाला. सातपुड्याच्या नटलेल्या वनराईत निसर्गरम्य वातारणात येथे दर वर्षी पोळ्याच्या दुसर्या दिवशी अर्थात पिठोरी अमावस्येच्या दुसर्या दिवशी यात्रा भरते. दर्शनाकरीता येणार्या भाविकांसाठी स्त्री- पुरूष अशा रांगा मंदिर व्यवस्थापनातर्फे लावण्यात आल्या. नवस फेडणार्या भाविक वर्गाकरीता सभा मंडपात व्यवस्था करण्यात आली. यात्रोत्सवात मंदिर संस्थानाचे अध्यक्ष शांताराम पाटीलसह त्यांच्या सर्व सहकार्यांनी परीश्रम घेतले. यावल पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनााली पोलीस अधिकारी, कर्मचार्यांसह गृह सुरक्षा दलाच्या माध्यमातुन बंदोबस्त राखण्यात आला.
0 टिप्पण्या