Subscribe Us

स्व .श्री. एम .एस .मुंदडा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला निवडणुकीचा अनुभव


अमळनेर: भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. लोकशाहीत निवडणूक ही खूप महत्त्वाची आहे. निवडणुका ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. निवडणुकांवर लोकशाहीचे भवितव्य अवलंबून असते. भारतातील कोणत्याही नागरिकांनी वयाची 18 वर्ष पूर्ण केली तर त्याला मतदानाचा हक्क प्राप्त होतो. याबाबत अनेक तरुण-तरुणी नागरिकांना माहिती नसते. 
         "मतदार राजा जागा हो. निवडणुकीचा धागा हो'' त्यासाठीच इ.10 वीच्या इतिहास राज्यशास्त्र विषयात " निवडणूक प्रक्रिया'' हा पाठ देण्यात आला आहे .इ.10 वीचे विद्यार्थी हे भावी मतदार आहेत .त्यामुळे या पाठावर आधारित कृतीयुक्त निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी या उद्देशाने लोकशाही पद्धतीने प्रत्यक्ष निवडणूक घेऊन वर्गमंत्री, शालेय पोषण आहार मंत्री, स्वच्छता मंत्री, सहल मंत्री यांची निवड करण्यात आली .
कृतीयुक्त निवडणुकीमुळे विद्यार्थ्यांना" निवडणूक प्रक्रिया '' पाठ समजणे अतिशय सोपे गेले.
या  निवडणुकीच्या रिंगणात  7 उमेदवार होते .
बहुमताने निवडून आलेले उमेदवार त्याची नावे व मिळालेले पद 
भूमिका अहिरे  - मुख्यमंत्री
देव पवार- शालेय पोषण आहार मंत्री
तेजस्विनी महाजन  - 
स्वच्छता मंत्री
प्रिती कोळी - सहल मंत्री
वरील उमेदवारांची निवड करण्यात आली.
विद्यार्थ्यांना दिलेले अनुक्रमांक तपासणे, बोटाला शाही लावणे, यासाठी मतदान केंद्राध्यक्ष, अधिकारी व कर्मचारी म्हणून मा.श्री.किशोर पाटील सर, मा .श्री.राजेंद्र महाजन सर, धमेद्र साळुंखे  यांनी भूमिका बजावली .मा.मुख्याध्यापक श्री धनराज महाजन सर यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
इतिहास राज्यशास्त्र विषय शिक्षक सुनिल पाटील सर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या