उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी 12 फेब्रुवारी 2023 रोजी घेतलेल्या पूर्वमाध्यमिक (इयत्ता 8वी) शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रीनलँड शाळेचा विद्यार्थी गिरीश संजय धोंगडे याने ग्रामीणमधून राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. गिरीशला या परीक्षेत 298 पैकी 286 (95.97%) गुण मिळाले आहेत.यापूर्वी त्याने पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता 5वी )शिष्यवृत्ती परीक्षेत 284 पैकी 262 (92.25%)गुण मिळवून राज्यात 10वा क्रमांक मिळविला होता.
त्याच्या ह्या यशात ग्रीनलँड शाळेचा सर्वात मोठा वाटा आहे. तसेच त्याने इयत्ता पहिलीपासून दिलेल्या विविध स्पर्धा परीक्षांचाही मोलाचा वाटा आहे.त्यामध्ये MTS जळगाव , ज्यूनिअर IAS लातूर, आॕलंपियाड परीक्षा इत्यादी परीक्षांमुळे त्याला हे यश मिळाले आहे. यापूर्वी त्याने MTS जळगाव परीक्षेत इयत्ता 2 रीत केंद्रात 3 रा क्रमांक तर इयत्ता 3 रीत केंद्रात प्रथम क्रमांक मिळविला होता. इयत्ता 4 थी आणि इयत्ता 6 वीत MTS परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला होता. ज्यूनिअर IAS ,लातूर परीक्षेत इयत्ता 3रीत राज्यात 3रा तर इयत्ता 4 थीत राज्यात 2 रा क्रमांक मिळविला होता. सर्वात महत्त्वाचे यशाचे गमक म्हणजे परीक्षा परिषदेच्या मागील वर्षाच्या आणि विविध प्रकाशनाच्या भरपूर प्रश्नपत्रिका सोडवणे, चुकलेल्या प्रश्नांवर चर्चा करणे - ते प्रश्न पुन्हा सोडवणे महत्त्वाचे आहे. गिरीशच्या या यशात ज्ञानज्योती क्लासेस (बनकर सर) आणि लातूर पॕटर्न यांचाही वाटा आहे.
0 टिप्पण्या