भुसावळ: किन्ही केंद्राचे केंद्रप्रमुख कमलाकर चौधरी, दिपनगर केंद्राचे केंद्रप्रमुख बी डी बोदडे, फुलगाव शाळेतील उपशिक्षिका मंगला रामावत या सेवानवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने किन्ही आणि दीपनगर केंद्रातील सर्व शिक्षक, शिक्षिका, पंचायत समिती शिक्षण विभाग यांनी मिळून या तिन्ही सेवामूर्तींना छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भुसावळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे शालेय पोषण अधीक्षक भुसावळ अजित तडवी, शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान, मुख्याध्यापक खडका हायस्कूल सुनील भिरूड हे उपस्थित होते. किन्ही आणि दीपनगर केंद्रातील सर्व शिक्षक,शिक्षिका कार्यक्रमाला उपस्थित होते. तिघे सेवानिवृत्त सत्कारमूर्तींविषयी सुनीता डोळे, शरद ढाके, प्रमिला पाटील, नयना चौधरी, महेंद्र पाटील, समाधान जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे अजित तडवी, तुषार प्रधान यांनी सुद्धा तिन्ही सेवानिवृत्त सत्कारमूर्तींविषयी त्यांच्या सेवा काळामध्ये केलेल्या कार्याचे कौतुक करून, त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले कमलाकर चौधरी हे अतिशय नियोजनबद्धरीत्या कार्य करणारे व्यक्ती आहेत. त्यांच्याजवळ माणसे जोडण्याची कला असून, त्यांनी त्यांच्या केंद्रातील शिक्षकांकडून अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने काम करून घेताना त्यांच्या केंद्रातील शाळा निपुण चाचणीमध्ये, बाला उपक्रमामध्ये, आधार कार्ड नोंदणी, मध्ये पट नोंदणी मध्ये तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकावर त्यांच्या केंद्रातील शाळा कायम ठेवल्या. दुसरे सत्कारमूर्ती केंद्रप्रमुख बी डी बोदडे यांच्या विषयी बोलताना सांगितले की बोदडे केंद्रप्रमुख हे कधीही कोणालाही न घाबरता कार्य करणारे केंद्रप्रमुख आहे. त्यांच्याकडून घेण्यासारखा हा गुण आहे. त्यांच्यावर अनेक संकटे आले असतील परंतु कोणत्याही संकटाला न घाबरता त्यांनी धैर्याने, हिमतीने संकटांना तोंड दिले. तिसऱ्या सत्कारमूर्ती मंगला रामावत या सेवानिवृत्त होत असून सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचे शिकवण्याचे कार्य करणार आहे. त्यांच्या शाळेला प्राथमिक शिक्षणाधिकारी जळगाव विकास पाटील साहेब यांनी त्यांच्या वर्गाला भेट दिली असता, त्यांचा वर्ग हा गुणवत्तापूर्ण असल्याचे सांगितले. अशा या सत्कार मूर्तींना सेवानिवृत्तीचा निरोप देताना सर्व शिक्षक भावुक झाले होते. त्यांच्याविषयी सर्वजण कृतज्ञता व्यक्त करत होते. ग्रेडेड मुख्याध्यापक म्हणून भुसावळ तालुक्यात कन्हाळे आणि फुलगाव शाळेत हजर झालेले ज्ञानदेव चौधरी, संजय हजबन यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक समाधान जाधव यांनी केले. तर आभार प्रदर्शन ओंकार पाटील यांनी केले. कमलाकर चौधरी, बी डी बोदडे, मंगला रामावत यांनी मनोगत व्यक्त करताना आमचा योग्य तो सत्कार, मानसन्मान केला. त्याबद्दल सर्व शिक्षकांचे, पंचायत समिती शिक्षण विभाग यांचे आभार मानले.
0 टिप्पण्या