जळगाव: जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव मार्फत दिनांक 20 एप्रिल रोजी शाळा पूर्व प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन कन्हाळे शाळेमध्ये केलेले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कन्हाळे शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक ज्ञानेश्वर चौधरी हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुनिता डोळे संगीता सूर्यवंशी, राजेंद्र ढाके उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक उपशिक्षक शिंदी समाधान जाधव, उपशिक्षक खेडी प्रमोद गांधीले यांनी मार्गदर्शन केले. उपशिक्षक समाधान जाधव यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, इयत्ता पहिली मध्ये जून 2023-2024 मध्ये प्रवेश करणाऱ्या मुलांसाठी स्टार्स प्रकल्प अंतर्गत शाळा पूर्वतयारी मोहीम राबवण्यात येत आहे. मागील काही वर्षापासून आपण कोरोना महामारीच्या संकटात होतो. या रोगाचा परिणाम मुलांच्या शिक्षणावरही झाला 2023 - 24 मध्ये दाखल होणारी मुले यांना प्रत्यक्षात अंगणवाडी आणि बालवाडीच्या शिक्षणाचा त्यांना अनुभव मिळालेला नाही. त्यासाठी शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन शाळा स्तरावर 28 एप्रिल 2023 रोजी आणि जून महिन्यामध्ये शाळा उघडल्यानंतर मेळाव्याचे आयोजन करायचे आहे. या दोन महिन्यांच्या काळात विद्यार्थी प्रवेशपात्र यादी तयार करणे, पालकांचे गट तयार करणे, त्यांचा मेळावा घेणे, त्यांना घरी कृती करण्यासाठी शाळेतले पहिले पाऊल हे पुस्तक देणे आणि त्यानुसार त्यांचे गट पाडून कृतीयुक्त आनंददायी शिक्षण देणे. अशा प्रकारचे नियोजन करण्यात आलेले आहे.
0 टिप्पण्या