Subscribe Us

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अजब प्रताप!


औरंगाबाद: माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शिक्षण विभागामार्फत आजपासून 10 वीच्या परीक्षेला (SSC Exam) सुरवात झाली आहे. पेपराला जाण्यापुर्वी अनेक विद्यार्थी आई-वडील, देवाच्‍या पाया पडून आशिर्वाद घेतात. परंतु, औरंगाबादमध्‍ये दहावीच्‍या काही विद्यार्थ्यांनी अजबच प्रकार केला. करत चक्‍क नारळ फोडून पेपराला सुरवात केली. याचा व्‍हिडीओ प्रचंड व्‍हायरल झाला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. उच्‍च शिक्षणाची पहिली पायरी म्‍हणून दहावीच्‍या परीक्षेकडे पाहिले जाते. ही पायरी पार करण्यासाठी विद्यार्थी वर्षभर मेहनत करत असतात. परंतु, परीक्षा जवळ आली की प्रत्येकाच्या मनात धाकधूक ही असतेच. ही धाकधूक कमी व्‍हावी याकरीता अनेक विद्यार्थी हे मंदिरात जावू देवाचे दर्शन करतात. शिवाय, आई- वडीलांचे देखील आशिर्वाद घेतात. परंतु, छत्रपती संभाजीनगर परिसरात परीक्षा केंद्राच्‍या बाहेर काही विद्यार्थ्यांकडून अजबच प्रकार केला आहे.


व्हायरल व्हिडीओ पाहण्यासाठी खाली 👇 क्लिक करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या