Subscribe Us

महाराष्ट्र राज्य प्राथ. शिक्षक संघाची सहविचार सभा संपन्न!


सोलापुर: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ महानगरपालिका सोलापूर यांची शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात शिक्षण मंडळ महानगरपालिका सोलापुर येथे चर्चा करण्यासाठी सहविचार सभा संपन्न झाली. याप्रसंगी मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी हनुमंत जाधवर यांचेसमवेत पर्यवेक्षक मनीष बांगर, संतोष बुलबुले,सुरेश कासार, भगवान मुंडे,रजनी राऊळ,शेख तसेंच कार्यालयीन कर्मचारी बिराजदार,जमादार,कारभारी यांचेसह म. ज.मोरे राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ,सोलापुर महानगरपालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय चौगुले,सरचिटणीस नवनाथ माळी उपस्थित होते. यावेळी प्रथमच प्रशासनाची वेळ घेऊन बैठक घेण्यात आली आणि संघटनेच्या बैठकीचे प्रोसिडिंग करण्यात आले सर्व प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेण्यात आले,आणि तसे संबंधित व्यक्तींना आदेश देण्यात आले. 
सदर बैठकीत पुढील प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. मागील दोन वर्षापासून प्रलंबित असणारे वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मंजूर करणे तसेच निवड श्रेणी प्रस्ताव मंजूर करणे,डीसीपीएस कपात सुरू करणे, मागील कपात रक्कम आणि शासन हिस्सा मिळणे,अर्जित/ दीर्घ रजा उपभोगल्यानंतर कार्यालयामध्ये रुजू होण्याची पद्धत बंद करणे,स्थायित्व नोंदी करणे व सेवा पुस्तक कॅम्प लावणे,बारा वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी प्रशिक्षण आयोजित करणे,वैद्यकीय बिले तसेच भविष्य निर्वाह निधी प्रकरणे तसेच विविध फरक बिले तात्काळ मंजूर करणे, शिक्षकांसाठी अभ्यास दौरा आयोजित करणे,बायोमेट्रिक मशीन मधील त्रुटींमुळे ते बंद करून जुन्या पद्धतीने शिक्षक हजेरीवरील उपस्थिती ग्राह्य धरणे,रिक्त पदवीधर पदावर नियुक्ती देऊन देय शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी देणे,शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्त करणे,शेऱ्यावर काम करणाऱ्या शिक्षकांना नियुक्ती आदेश देणे,शिक्षक विनंती बदली आराखडा तयार करणे,जनगणना नोंद करणे,सातव्या वेतन आयोगातील प्रकल्पामुळे शिक्षकांवरील झालेला अन्याय दूर करणे,प्रभारी केंद्रप्रमुख असणाऱ्या शिक्षकांना तात्पुरता आदेश देणे,बालवाडी शिक्षिका, सेविका नेमणुका करणे,शिक्षकांच्या सीआर वर स्वाक्षरी घेणे,अहर्ता प्राप्त शिक्षकांच्या नोंदी सेवा पुस्तकात नोंदी घेणे यावेळी शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष प्रदीपासिंह ठाकूर,कोषाध्यक्ष हनुमंत लंगोटे,कार्यालयीन चिटणीस भारत खारे, महिला आघाडी प्रमुख अश्विनी लांबतुरे, सहचिटणीस सविता पवार,उपाध्यक्ष निशिकांत जगताप,धोंडू केंगले, सविता जाधवर,संघटक संगीता जाधव,सविता जाधव,प्रसिद्धी प्रमुख अविनाश हिंगणे, महिला प्रतिनिधी मनीषा माळी,सुनीता वाघमारे,शिवगंगा सागरे आदिसाह शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक माळी यांनी केले तर आभार ठाकूर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या