(चिंचवड)पुणे: शब्दधन काव्यमंचच्या वतीने प्रतिवर्षी दिले जाणारे काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. प्रसिद्ध लेखक आणि निवेदक श्रीकांत चौगुले यांना शब्दधन प्रतिभा पुरस्कार तर कवी हेमंत जोशी आणि कवी सुभाष चटणे यांना कवी अरविंद भुजबळ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शामला पंडित, मयुरेश देशपांडे, अरुण कांबळे, योगिता कोठेकर (पिंपरी चिंचवड) यांना “छावा काव्य पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा लवकरच करण्यात येणार आहे, असे शब्दधन काव्यमंचचे अध्यक्ष सुरेश कंक, उपाध्यक्ष सुभाष चव्हाण, कोषाध्यक्ष तानाजी एकोंडे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
शिवभूमी विद्यालय प्राथमिक विभाग निगडी येथील शिक्षिका व कवयित्री कोठेकर योगिता संजय यांनी कोरोना काळात आदर्श शिक्षकाची कामगिरी उत्तमपणे पार पाडली आणि आनंददायी अध्ययन अध्यापनाचे त्यांचे कार्य, स्वाध्याय तंत्रस्नेही बनून अविरत चालू असते. खेळातून अध्यापन, परिपाठ मूल्यशिक्षण वाचन उपक्रम, कात्रणातून पुस्तके , इंग्रजी वाचन कार्ड असे अनेक उपक्रम गेले २८ वर्ष त्या विविध पद्धतीने राबवित असतात विद्यार्थ्यांना बाह्यपरीक्षा बाह्यस्पर्धेत सहभागी होण्यास मार्गदर्शन करतात अनेक बक्षिसे त्यांच्यामुळे शाळेला विद्यार्थ्यांना दर वर्षी मिळत असतात त्यांच्या या कार्याबदल हा पुररकार जाहिर झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे आणि शुभेच्छा दिल्या जात आहेत.
0 टिप्पण्या