Subscribe Us

वडिलांचा स्मृतिदिन घरी न करता जि. प. शाळा शिंदी येथे विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्य वाटप!


सावदा येथील श्रीमती वैशाली सिद्धार्थ वाघ या गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल सावदा येथे कर्मचारी आहेत. त्यांच्या वडिलांचं निधन झालेल असून त्यांचा स्मृतिदिन दिनांक ६ फेब्रुवारी रोजी होता. या कौटुंबिक कार्यक्रमासाठी येणारा खर्च घरी न करता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून वडिलांचा स्मृतिदिन साजरा केला. या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी उजळणी, एक रजिस्टर, एक पेन आणि इतर शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना भेट देऊन स्मृतिदिन साजरा केला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी सरपंच कैलास पाटील, सेवानिवृत्त पदवीधर शिक्षिका लीला सपकाळे, डिझाईनर लोकमत नाशिक प्रकाश सपकाळे, कार्टून चित्रकार आणि कार्टून सिने दिग्दर्शक मोहन सपकाळे यांच्या उपस्थितीत साजरा केला. याप्रसंगी त्यांनी आपल्या वडिलांची घरची परिस्थितीअत्यंत गरिबीची असताना सुद्धा आपले शिक्षण केले. ''मुलगी हे परक्याचं धन आहे, तिला शिकवून काय करणार..असा समाज जव्हा मह्या बापाले हिनवत होता ;तव्हा तितक्याच ऐटीत मह्या बाप मले शाळेत, सायकल वरून ने-आण करत होता..अशा कवितेच्या दोन ओळी  त्यांनी सादर केल्या .इयत्ता दहावी पास झाल्यानंतर त्यांना शिक्षणासाठी वरणगाव येथे जावे लागत होते. तेव्हा वडिलांनी एक जुनी सायकल घेऊन त्यांना अकरावी, बारावी या दोन वर्षाच्या शिक्षणासाठी रोज सकाळ संध्याकाळ सायकल वरून ने आण करून शिक्षण दिले आणि पावसाच्या पुरामध्ये वडील सायकल सह वाहून जात होते. हा बिकट प्रसंग त्यांनी त्या ठिकाणी सांगितला आई मुलांसाठी खुप काही करत असते तितकेच वडील ही आपल्या साठी तळमळीने कष्ट करतात असे भावुक होऊन त्यांनी आपल्या वडीलांना श्रद्धेची श्रद्धांजली आणि आदराची आदरांजली अर्पण केली.. व आपल्या भावनांना त्यांनी अश्रूं वाटे वाट करून दिली. या कार्यक्रमासाठी शाळेतील मुख्याध्यापक भगवान बडगुजर, उपशिक्षक समाधान जाधव, प्रीती फेगडे, मीनाक्षी पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान जाधव यांनी तर आभार प्रीती फेगडे मॅडम यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या