Subscribe Us

वर्धा साहित्य संमेलनात कवी संजय धोंगडे यांच्या कवितेचे सादरीकरण


उस्मानाबाद : वर्धा येथे  96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उस्मानाबाद येथील कवी संजय लिंबराज धोंगडे यांनी 'माय माझी' या कवितेचे सादरीकरण करून रसिकांची दाद मिळवली. 
          यापूर्वी उस्मानाबाद येथील 93 व्या साहित्य संमेलनात आणि नाशिक येथील 94 व्या साहित्य संमेलनात संजय धोंगडे यांनी  कविता सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली होती. आतापर्यंत त्यांनी अनेक राज्य, जिल्हास्तरीय कविसंमेलनातही कवितांचे सादरीकरण केले आहे. शाळेतील मुलांचा त्यांनी चिमुकली काव्यफुले हा बालकविता संग्रह प्रकाशित केलेला  आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या