मुंबई | प्रतिनिधी : सायन येथील दि न्यू सार्वजनिक एज्युकेशन सोसायटी संचालित लायन एम. पी. भुता सायन सार्वजनिक विद्यालयाच्या इंग्रजी व गुजराती माध्यमाच्या शाळेत नुकताच " मराठी राजभाषा गौरव दिन " मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी तसेच मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली.मराठी अस्मितेचा मानबिंदू असणारे ज्ञानपीठ, पद्मभूषण पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन शाळेत अतिशय उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठीतील संत साहित्य जसे ओवी, भारुड ,अभंग सादर करण्यात आले. तसेच मराठी लोकनृत्य , विविध सण , विद्यार्थ्यांनी अतिशय छान पद्धतीने नृत्याद्वारे दर्शविले. त्याचबरोबर शिक्षकांचा काव्यवाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला . शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुंदर असे "मराठी अभिमान गीत" सादर केले. विद्यार्थ्यांची प्रश्नमंजुषा घेण्यात आली या प्रश्नमंजुषेत मराठी विषयावरील विविध प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात आले. मराठी साहित्यातील कलागुणांचा गौरव करण्यासाठी "झी गौरव गीत" विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने सादर केले. मराठीतील प्रसिद्ध , नामांकित व्यक्तिमत्व "ही जन्मभूमी ,ही कर्मभूमी "या गाण्यात्वारे विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने दर्शविले. शेवटी पसायदान द्वारे कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला. शाळेचे कार्यकुशल मुख्याध्यापक जगदीश इंदलकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.
0 टिप्पण्या