अमळनेर: येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल मधील इयत्ता १० वी च्या विदयार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाळेचे चेअरमन योगेश मुंदडे अध्यक्षस्थानी होते. जी.एस.हायस्कूल मधील सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभात शाळेचे चेअरमन योगेश मुंदडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर मेहनत व जिद्द महत्वाची आहे. एक ध्यास घेऊन आपलं ध्येय गाठलं पाहिजे. शालेय जीवनात शिस्तीला जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व महाविद्यालयात गेल्यावर देखील आत्मसात केली पाहिजे. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुख्याध्यापक डी.एच.ठाकूर, उपमुख्याध्यापक आर.एल.माळी, पर्यवेक्षक सी.एस.पाटील, एस.बी.निकम यांनी विद्यार्थ्यांना प्रशासकीय सूचना तसेच परिक्षेसंदर्भात मार्गदर्शन केले. याप्रसंगी तज्ञ मार्गदर्शक प्रशांत काटकर(मराठी), के.डी.साळुंखे(हिंदी), एम.ए.पाटील(इंग्रजी), एस.ए. खांजोडकर(विज्ञान), एस.आर.शिंगाणे(गणित), सी.एस.सोनजे (इतिहास), जि.एस.चौधरी(भूगोल) यांनी विषयवार मार्गदर्शन केले. यावेळी शालेय क्रीडा स्पर्धेतील विदयार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन आर.जे.पाटील यांनी केले तर आभार एस.ए.बनसोडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शिक्षक व शिक्षकेतर बंधू यांनी सहकार्य केले.
0 टिप्पण्या