अमळनेर :खा.शि मंडळाच्या द्रौ.रा.कन्या शाळा परिसरात लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी सीसीटीव्ही खरेदी करण्यासाठी परिसरातील ज्या नागरिकांनी मदत केली त्या सर्वांचा खा.शि.मंडळाच्या सर्व संचालकांनी सत्कार केला. त्यावेळी डीवायएसपी राकेश जाधव यांनी सर्वांच्या आभार मानले. न्यू प्लॉट परिसरात खाशी मंडळाच्या पी बी ए इंग्लिश मिडीयम व द्रौ.रा.कन्या शाळा अश्या दोन शाळामिळून दोघे शिपमध्ये चार हजाराच्यावर विद्यार्थी शिकतात. या मार्गावर खूपच वर्दळ असल्याने परिसरातील टारगट मुलांचा खूपच त्रास असतो. भविष्यात कुणालाही त्रास होऊ नये या उद्देशाने डीवायएसपी राकेश जाधव यांनी केलेल्या अवाहनाला साथ देत न्यू प्लॉट परिसरातील रहिवाशी माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, सुरेश पाटील, द्रौ.रा.कन्या शाळेचे चेअरमन प्रदीप अग्रवाल, अमित ललवाणी, डॉ.नितीन पाटील, डॉ.बी.ओ.पाटील, प्राजक्ता बहुगुणे, भारती पाटील, महेश पवार, डॉ.राहुल मुठे, ॲड.महेश बागुल, प्रगतिशील शेतकरी गिरीश पाटील, संभाजी पाटील यांनी मदत केली. सीसीटीव्ही लोकार्पण सोहळ्यात खा.शि.मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, माधुरी पाटील, विश्वस्त वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष हरी भिका वाणी, कार्योपाध्यक्ष योगेश मुंदडे, समन्वय समिती चेअरमन डॉ.अनिल शिंदे, संचालक नीरज अग्रवाल, शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस.सूर्यवंशी, पर्यवेक्षक व्ही.के.वानखेडे, व्ही.एम.कदम, जेष्ठ शिक्षक के.एस.मोरे, एस.एस.माळी, पत्रकार मिलिंद बडगुजर, विजय गाढे, दिनेश पालवे, रवींद्र मोरे, दिपक काटे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी बंधूनी सहकार्य केले. सीसीटीव्ही कॅमेरे उद्घाटन करण्याचामान द्रौ.रा.कन्या शाळेतील इयत्ता ९ वी ब ची विद्यार्थीनी कु. तन्वी शेखर सोनार ने उद्घाटन केले. याची सकारात्मक चर्चा परिसरात होती.
0 टिप्पण्या