अमळनेर: स्व. श्री. एम. एस. मुंदडा माध्यमिक विद्यालयात 28 फेब्रुवारी "राष्ट्रीय विज्ञान' दिवसाच्या निमित्ताने विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात एकूण १३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.व त्यांनी सौर उर्जेवर चालणारे कुलर, एटीएम मशीन, मानवी फुफ्फुस, जल शुद्धीकरण केंद्र, रॉकेट, मोबाईल, कॅम्पुटर, गाडीच्या घर्षणाच्या माध्यमातून हायवेवर विद्युतीकरण इत्यादी वेगवेगळी उपकरणे विद्यार्थ्यांनी तयार केली व त्यांची माहिती देखील दिली. त्या 13 मॉडेल्स मधूनच प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांक निवडण्यात आले.
कु.दिव्या एकनाथ भोई-8 वी एटीएम मशीन -प्रथम
कुणाल किसन कालेँकर- 8 वी सौर ऊर्जा कुलर -द्वितीय प्रिती कैलास कोळी - 9 वी पवन उर्जा प्रकल्प -तृतीय
या तिघाही विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय विज्ञान दिन या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात इ. 9 वीची विद्यार्थिनी कु.प्रिती कैलास कोळी हिने "विज्ञान गीत 'म्हटले. "विज्ञान वरदान की शाप'' याविषयी भूमिका अहिरे व हर्षदा विसपुते या विद्यार्थ्यीनीनी माहिती दिली. तसेच उपक्रमशील विज्ञान शिक्षिका मा.सौ. नेहा पाटील मॅडम यांनी विज्ञान दिवसाचे महत्व सांगितले .जन्मापासून ते मृत्यूपर्यंत मानवाशी निगडित विज्ञानाविषयी माहिती दिली. तसेच मॅडमाँनी विज्ञानावर आधारित विचारलेल्या प्रश्नांना विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मुख्याध्यापक धनराज महाजन सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जीवनात असलेले विज्ञानाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ.9 वीची विद्यार्थिनी कु. साक्षी भोई हिने केले. तर आभार सुनील पाटील सर यांनी मानले. सदर कार्यक्रमाचे नियोजन उपक्रमशील विज्ञान शिक्षिका मा.सौ नेहा पाटील मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. "राष्ट्रीय विज्ञान ''दिवसाच्या निमित्ताने सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूल अमळनेर या ठिकाणी झालेल्या विज्ञान प्रदर्शनात परीक्षक म्हणून उत्कृष्ट कामकाज सांभाळल्यामुळे मा.सौ. नेहा पाटील मॅडम यांचा त्या ठिकाणी सत्कार करण्यात आला
0 टिप्पण्या