पुणे: महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणाली द्वारे शिक्षक भरती करिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. या परीक्षेसाठी 31 जानेवारी 2023 पासून आवेदन सुरू होऊन 8 फेब्रुवारी 2023 पर्यंत उमेदवारांना आवेदन करता येणार आहे. या परीक्षेला 22 फेब्रुवारी 2023 पासून सुरुवात होणार आहे. या परीक्षेसाठी सर्व डीएड आणि बीएड तसेच टीईटी आणि सिटीईटी अर्हताधारक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 950 आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 850 रुपये परीक्षा शुल्क द्यावे लागणार आहे. सदर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांना काही अडचण उद्भवल्यास msce.tait2022@gmail.com या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन परीक्षा परिषदेतर्फे करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या