"जि.प.उच्च प्राथमिक शाळा पिंगळवाडे शाळेच्या ३ विद्यार्थ्यांची इ.५ वी पुर्व उच्च प्राथमिक (PUP) शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे."
अमळनेर- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परिक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल ७ नोव्हे.२०२२ रोजी जाहीर करण्यात आला होता. परंतु अंतिम निकाल दिनांक ०३ जानेवारी २०२३ रोजी जाहीर करण्यात आला आहे. राज्यात पाचवीच्या परीक्षेत २३.९० टक्के विद्यार्थी आणि आठवीच्या परीक्षेत १२.५३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
त्यामध्ये अमळनेर तालुक्यातील जि.प.उच्च प्राथ.शाळा पिंगळवाडे शाळेतील प्राची विनोद पाटील, शितल गोकुळ कोळी व साहिल युवराज पारधी या ३ विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित केले असून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांना वर्गशिक्षक दत्तात्रय सोनवणे, मुख्याध्यपिका वंदना ठेंग, पदवीधर शिक्षक प्रविण पाटील, उपशिक्षक रविंद्र पाटील व वंदना सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या या यशाबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, शिक्षणविस्तार अधिकारी पी.डी.धनगर, केंद्रप्रमुख चंद्रकांत साळुंके, निवृत्त प्रांताधिकारी भागवत सैंदाणे, निवृत्त उपअभियंता डी.पी.पाटील, पिंगळवाडे गावच्या सरपंच मंगला देशमुख, उपसरपंच अतुल पाटील, पोलिस पाटील गजेंद्र पाटील, शा.व्य.समिती अध्यक्षा कल्पना पारधी, उपाध्यक्ष समाधान पाटील, तसेच श्रीक्षेत्र पिंगळवाडे, मेहेरगांव येथील ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी यांनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या