Subscribe Us

विदयार्थ्यांचा भावनिक विकास हा गरजेचा - चंद्रकांत चौधरी

दि .१८ , शेळावे ता पारोळा: आज केंद्र शाळा शेळावे बु॥ येथे ६वी शिक्षण परिषद आयोजक जि प उच्च प्राथ शाळा दगडी सब गव्हाण यांच्या मार्फत उत्साहात संपन्न झाली . शिक्षण परिषदेच्या सम्वयक छाया महाजन , समावेशक तज्ञ तर अध्यक्षस्थानी धाबे शाळेचे वरिष्ठ शिक्षक तथा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष समता शिक्षक संघ गुणवंतराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणुन शापोआ अधिक्षक चंद्रकांत चौधरी हे उपस्थित होते.
परिषदेची प्रस्तावना मुख्याध्यापक तथा राज्याध्यक्ष पदविधर शिक्षक महासंघ गिरीष वाणी यांनी केली . सुत्र संचलन रत्नाकर पाटील यांनी केले . शालेय स्पर्धा परिक्षा तयारी या विषयावर विशाल देशमुख , चला तंत्रस्नेही होवु या हया विषयावर रामेश्वर भदाणे , जीवन कौशल्य भावभावनांचे व्यवस्थापन या विषयावर रत्नाकर पाटील , निपुण भारत या विषयावर हितेंद्र तावडे , निपुण चाचणी बाबत प्रतिभा वाडीले यांनी मार्गदर्शन केले . वंजारी शाळेचे मुख्याध्यापक तथा जिल्हा उपाध्यक्ष शिक्षक संघ अनिल चौधरी यांनी आयकर बाबत माहिती दिली .
या वेळी नाना साळुंखे , एरंडोल व रजनिकांत पाटील , धरणगांव यांची पारोळा शिक्षक पतपेढी सदस्य म्हणुन निवड झाल्या बद्दल व स्मिता देसले , खेडीढोक यांच्या वर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत आल्या बद्दल आयोजक शाळेतर्फे मान्यवरांच्या शुभहस्ते अभिनंदन व सत्कार करण्यात आला .
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत चौधरी यांनी शिक्षण परिषदेला भेट देवुन मार्गदर्शन केले . त्यावेळी ते म्हणाले " विद्यार्थ्यांचा शिक्षणा बरोबर भावनिक विकासही साधला पाहिजे. शिक्षण घेणे किती गरजेचे आहे ही भावना त्यांच्या मनात प्रबळ करून स्वतःचा , कुटुंबाचा व समाजाचा विकास त्यांच्या मनावर बिंबविणे गरजेचे आहे. धाबे शाळेचे राज्य शिक्षक मनवंतराव साळुंखे यांनी सहभागी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक दिले. विषय शिक्षिका स्नेहल साळुंखे यांनी अपंग विद्यार्थ्यांबाबत आढावा घेतला. केंद्र शाळा शेळावे बु॥ मुख्याध्यापक व शिक्षकांचे अनमोल सहकार्य लाभले. यावेळी विशेष म्हणजे आयोजक शाळेने सर्व उपस्थितांना स्वामी विवेकानंद - संक्षिप्त चरित्र आणि उपदेश हे पुस्तक व पेन भेट दिले . प्रतिभा पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या