सन 2022 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढापुरी तालुका शिरूर जिल्हा पुणे या शाळेतील चार विद्यार्थी पुणे जिल्ह्यातील गुणवत्ता यादीत आले आहेत वैष्णवी संजय पपूलवार 260 गुण, नरेंद्र योगेश चव्हाण 242 गुण, मनस्वी नवनाथ गायकवाड 240 गुण, श्रेयस संतोष नाईक 238 गुण, शिष्यवृत्ती परीक्षेत 88.46% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 200 पेक्षा अधिक गुण प्राप्त झालेले दहा विद्यार्थी आहेत. वर्गशिक्षिका संगीता ज्ञानेश्वर तिरखुंडे आणि श्री लालासाहेब लक्ष्मण जाधव या शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी अभिनंदन केले शाळा व्यवस्थापन समिती, मा.सरपंच स्वप्निलभैया गायकवाड सरपंच संदिप डोमाळे उपसरपंच श्री सुनिल तात्या गायकवाड व सदस्य ग्रामपंचायत कोंढापुरी, श्री धनंजय गायकवाड अध्यक्ष ग्रामविकास फाउंडेशन उदयोजक विनयशेठ गायकवाड, पालक आणि ग्रामस्थांच्या वतीने सर्व विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचा शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबद्दल सत्कार करण्यात आला मुख्याध्यापक श्री सुदाम बाळकृष्ण लंघे व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नानासाहेब अंबर गायकवाड यांचे विशेष सहकार्य मिळाले त्यामुळे प्रथमच कोंढापूरी शाळेचे चार विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवत्ता यादी मध्ये आले आहेत. सहकारी शिक्षक विनायक पडवळ, सौरभ नवसुपे, उत्तम होलगुंडे अनिल महाजन राजू वेताळ मीना कळमकर निता औटी यांचे ही सहकार्य मिळत होते
0 टिप्पण्या