भुसावळ: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदी तालुका भुसावळ येथील शाळेमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा घेण्यात आला. या बाल आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्टॉल लावलेले होते. यामध्ये शैक्षणिक साहित्याचा स्टॉल सौंदर्यप्रसाधनांचा स्टॉल, भाजीपाला विक्रीचा स्टॉल, इडली, समोसा, डोसे, पाणीपुरी, कचोरी, पापड, पोंगे, हरभऱ्याची उसळ, तुरीची उसळ, भेळ, कोथंबीरच्या वड्या, वडापाव, पाव वडे, विविध प्रकारचे तळलेले पापड, मक्याच्या लाह्या पोहे, उकळलेली गोड बोरे, कांद्याची भजी, मुगाची भजी, पालक भजे, उडीद डाळ वडे, याप्रमाणे विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे सुमारे 40 स्टॉल लावलेले होते. या बाल आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञानाची ओळख झाली. पैशांची देवाणघेवाण यांची ओळख झाली. त्याचप्रमाणे पैशांचे व्यवहार करताना बेरीज, वजाबाकी या संकल्पना स्पष्ट झाल्या. या बाल आनंद मेळाव्यासाठी श्रीकृष्ण हायस्कूल मधील विद्यार्थी, शिक्षक, उपस्थित होते. त्याचप्रमाणे गावातील ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ विकत घेऊन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाच्या सरपंच सौ नीता किरण जाधव, प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश जावळे, एम पी डब्ल्यू डॉ बालाजी कोरडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कांचन परदेशी, व्यवस्थापन समिती सदस्य बन्सीलाल पाटील, चारुलता कोल्हे, सुनील कोल्हे, जया कोळी, पुंडलिक पाटील, डॉ.सचिन महाजन, अमोल कोळी, ग्रामपंचायत सदस्य सुनील गायकवाड, माजी उपसरपंच सिद्धार्थ तायडे, रेल्वे कर्मचारी विनोद तायडे, मुकेश लिधुरे, शाम अडवकर, समाधान खराटे, गौतम सुरवाडे, चेतन चौधरी आणि ग्रामस्थ, पालक, विद्यार्थ्यांचे आई-वडील, आजी-आजोबा, भाऊ-बहीण उपस्थित होते. बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. बाल आनंद मेळाव्याविषयी शाळेतील आदर्श शिक्षक समाधान जाधव सर यांनी माहिती दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश जावळे यांनी शालेय जीवनात पोषण आहाराचे महत्व समजावून सांगितले. संतुलित आहार का आवश्यक आहे? हे सुद्धा समजावून सांगितले आणि या बाल आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांना पैशांच्या देवाण घेवाण विषयी व्यवहारिक ज्ञानाचे कशी ओळख होईल हे स्पष्ट करून सांगितले. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक भगवान बडगुजर, उपशिक्षक समाधान जाधव, उपशिक्षिका प्रीती फेगडे, मीनाक्षी पाटील शालेय पोषण आहार मदतनीस देवका परदेशी, प्रमिला पाटील यांनी परिश्रम घेतले. बाल आनंद मेळाव्याला भेट दिलेल्या पालकांनी ग्रामस्थांनी सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे खूप कौतुक केले आणि शाळेतील या आनंददायी वातावरण निर्मितीसाठी सर्व शिक्षकांचे मनापासून आभार व्यक्त केले.
0 टिप्पण्या