अमळनेर: वर्धा येथील ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच्या कविकट्टयावर कवयित्री सौ सुनिता रत्नाकर पाटील यांची निवड झाली आहे. या संमेलनात ४ फेब्रुवारी रोजी दुपार सत्रात ' नदीचा काठ' या कवितेचे त्या काव्यवाचन करणार आहेत. या आधी देखील नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात काव्यवाचन केले आहे.
सौ सुनिता पाटील ह्या जि प केंद्रशाळा वावडे ता अमळनेर येथे कार्यरत असून त्या खान्देश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य शाखा अमळनेरच्या तालुकाध्यक्ष आहेत. तसेच ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ' रेवती एक काव्य परिमळ ' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले आहे.त्यांचे मुळगाव ढेकू खूर्द ता अमळनेर हे आहे. त्यांचा अनेक राज्यस्तरीय मराठी तथा आहिराणी काव्य संमेलनामध्ये निमंत्रित कवी म्हणून काव्यवाचनात सहभाग असतो. त्यांच्या निवडीबद्दल खान्देश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य, जळगाव, शाखा - अमळनेर, साने गुरुजी विचारमंच, अमळनेर, शिवशाही फाऊंडेशन अमळनेर तसेच सर्व शिक्षक वर्गातून व परासरातून अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या