Subscribe Us

प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त देशभक्तीचा जागर!


अमळनेर : प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर झालेल्या सामूहिक शासकीय कार्यक्रमात विविध शाळांनी देशभक्तीचा जागर केला.
     प्रभारी उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार अनिल पाटील ,माजी आमदार शिरीष चौधरी , माजी जिल्हापरिषद सदस्य जयश्री पाटील , तहसीलदार मिलिंदकुमार वाघ , जेष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा  पाटील , पोलीस निरीक्षक विजय शिंदे , तालुका कृषी अधिकारी भारत वारे ,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे , नायब तहसीलदार नवनाथ लांडगे , संतोष बावणे , उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड ,सहा पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी ,प्रवीण पाठक  हजर होते.
    प्रथम पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलन करण्यात आले. होमगार्ड पथकाचे नेतृत्व उषा पाटील यांनी केले. आर्मी स्कूल आणि ग्लोबल स्कूल चे एनसीसी विद्यार्थी पथसंचलनात सहभागी झाले होते. विविध शाळांनी देशभक्ती , स्वच्छता अभियान तसेच लोकगीतांवर नृत्य करून राष्ट्रप्रेम व संस्कृती इतिहासाला उजाळा दिला. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले. कार्यक्रम सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनातर्फे प्रमाणपत्र आणि आधार एज्युकेशनल संस्थेचे अशोक पाटील यांच्यातर्फे गौरव चिन्ह देऊन कौतुक करण्यात आले. कार्यक्रमास रणजित शिंदे ,सुनील वाघ ,महेश माळी , निलेश विसपुते यांचे सहकार्य लाभले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या