लोकमान्य विद्यालयातील श्री.राजेंद्र दिनकरराव निकुंभ हे ३० नोव्हेंबर २०२२ रोजी ३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. जिल्हा नियोजन अधिकारी श्री.प्रतापराव पाटील यांच्या हस्ते निकुंभ सरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच लोकमान्य शिक्षण मंडळ बालविकास मंदिर, नवीन मराठी शाळा, लोकमान्य विद्यालय व निकुंभ सरांवर प्रेम करणारे स्नेही जन यांच्यातर्फे ही निकुंभ सरांचा सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात जिल्हा नियोजन अधिकारी श्री.प्रतापराव पाटील, लोकमान्य शिक्षण मंडळाचे पदाधिकारी आणि बाल विकास मंदिर, नवीन मराठी शाळा व लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी श्री.प्रतापराव पाटील, श्री.आत्माराम चौधरी, श्री.रविंद्र लष्करे, श्री.मच्छिंद्र मोरे, श्री.जे.के. चौधरी, श्री.सतीष देशमुख श्री.जे.डी. निकुंभ, तसेच लोकमान्य शिक्षण मंडळाचे डाॅ.प्रा.प्र.ज.जोशी, श्री विवेक भांडारकर, श्री.राजेंद्र नवसारीकर, श्री.डी.डी. पाटील या संचालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला श्री.अरविंद फुलपगारे, श्री.राजेंद्र खाडिलकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन श्री.विजय सुर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षिका सायली देशपांडे यांनी केले.
0 टिप्पण्या