अमळनेर :- आज श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर अमळनेर शाळेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस उपक्रमशील शिक्षक व्ही. डी. पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच सदर प्रसंगी निकिता गजानन पाटील आणि भाविका दिलीप निकम या शालेय मुलींनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा "जीवन संघर्ष आणि आपल्याला मिळालेला संविधानाचा सुखाचा हर्ष " याविषयी कथन करताना भाविका निकम या विद्यार्थिनीने ' होती किती क्रूर रात्र ती, ज्या रात्रीने केला घात,आठवता महापरिनिर्वाण बाबासाहेबांचं, डोळे पानावून जातात, डोळे पानावून जातात ! ना झुकला कुणापुढे भीमराया आमचा, आहे त्या चैत्यभूमीला अभिवादन करती दादरला, तसेच निकिता पाटील या मुलीनेही आपल्या मनोगतात सांगितले की, " तू देव नव्हतास आणि देवदूतही नव्हतास, तू फक्त मानव जातीची पूजा करणारा खरा महामानव हिरा होतास, खरा महामानव हिरा होतास .सदर प्रसंगी प्रमुख अतिथी मुख्याध्यापक संदीप पवार ,डी .एस. माळी, ए .पी .जाधव ,वाय. जे .पाटील, आर. डी .महाजन, पी. एम .ठाकरे, पी. ए. शेलकर ,एम.एस.सुशीर ,डी.एस. कारले आणि डी .ए. सोनवणे आधी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी. डी .निकम मॅडम यांनी केले. त्यांच्या समवेत बी. एस. चव्हाण, ए. यु .महाजन, पी. पी .पाटील, एस. एस. तेले, हे उपस्थित होते. तसेच निकिता गजानन पाटील आणि भाविका निकम यांना भेटवस्तू देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चतुर्थ कर्मचारी अशोक सैंदाणे यांनी सहकार्य केले.
0 टिप्पण्या