Subscribe Us

स्व.श्री .एम .एस . मुंदडा माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय गणित दिवसाच्या निमित्ताने "गणितीय रांगोळी स्पर्धा '' व"गणितीय प्रश्नमंजुषा स्पर्धा'' उत्साहात संपन्न

अमळनेर - आज स्व.श्री . एम .एस. मुंदडा माध्यमिक विद्यालयात 22 डिसेंबर रोजी  गणित तज्ञ डाँ.श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस "राष्ट्रीय गणित दिवस '' म्हणून साजरा करण्यात आला. उपक्रमशिल गणित शिक्षिका मा.सौ नेहा पाटील मॅडम यांनी डॉ. श्रीनिवासन रामानुजन यांच्या जीवन  कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली . त्यानंतर "गणितीय रांगोळी'' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .
त्यात एकूण 25 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. व त्या गणितीय रांगोळी स्पर्धेतून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले .
1️ चि.मयूर भाईदास जाधव इ.नववी  - प्रथम
2️कु. प्रिती कैलास कोळी इ.नववी - द्वितीय
3️कु.भाग्यश्री संदीप कोळी
इ. दहावी  - तृतीय
4️कु.मोहिनी दिपक सोनवणे
इ.आठवी -उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात आले.  
त्यानंतर गणितावर आधारित " प्रश्नमंजुषा ''कार्यक्रम मा. सौ. नेहा पाटील मॅडम यांनी घेतला .
मॅडमांनी विचारलेल्या गणितीय प्रश्नांना विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या